किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलकृषी कायदे फायद्याचे असल्याचा दावा,
नवी दिल्ली, १२ डिसेंबर – मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व माओवादी आणि डाव्यांच्या हातात गेले असून डावे आपला अजेंडा या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप रेल्वेमंत्री तसेच वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केला आहे. ते एका हिंदी वृत्तपत्राशी बोलत होते.
शेतकर्यांना माओवादी आणि डाव्यांकडून भडकावण्यात येत आहे, तर सरकार प्रत्येक मुद्यावर चर्चेसाठी तयार आहे. प्रस्तावित कायद्यामुळे फायदाच होणार असून काही थोड्या लोकांसाठी संपूर्ण देशातील शेतकर्यांचे नुकसान होऊ देता येणार नाही. शिवाय हे कायदे मागे घेण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे मंत्री गोयल यांनी ठामपणे सांगितले.
शेतकर्यांप्रति आशा व्यक्त करीत गोयल म्हणाले की, विधेयकातील तरतुदींवर चर्चा करू इच्छित असतील तर सरकार केव्हाही तयार आहे. यंदा २३ टक्केअधिक शेतकर्यांकडून धान्य खरेदी करण्यात आले. देशहिताचे असलेले हे कायदे शेतकरी नक्कीच समजून घेतील.