Posted by वृत्तभारती
Monday, June 7th, 2021
तंत्रज्ञान हस्तांतरणाची तयारी, बंगळुरू, ७ जून – भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्राने तीन वेगवेगळ्या प्रकारचे व्हेंटिलेटर्स विकसित केले आहे. देश सध्या कोरोनाच्या दुसर्या लाटेशी लढा देत असल्याने, वैद्यकीय वापराकरिता या तंत्रज्ञानाचे उद्योगांना हस्तांतर करण्याची तयारीही इस्रोने दर्शवली आहे. ‘प्राण’ अर्थात् ‘प्रोग्रामेबल रेस्पिरेटरी असिस्टन्स फॉर द नीडी एड’ असे या व्हेंटिलेटर्सचे नाव असून, त्याची किंमतही अतिशय कमी आहे आणि पोर्टेबल असल्याने एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी ते सहजपणे नेता येते. जास्त...
7 Jun 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, May 25th, 2021
एका तासात प्राणवायूचा स्तर ९४ वर गेला, इंदूर, २५ मे – येथील एका खाजगी रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आलेल्या ७० वर्षीय महिलेला डीआरडीओने विकसित केलेल्या २-डीऑक्सी-डी ग्लुकोज अर्थात् २-डीजी हे औषध देण्यात आल्यानंतर या महिलेच्या शरीरातील प्राणवायूचा स्तर अवघ्या एका तासातच समाधानकारक पातळीवर वाढल्याचे दिसून आले. डीआरडीओचे हे औषध कोरोनाबाधितांची संजीवनी ठरणार असल्याचेच यावरून दिसून आले. हे औषध घेतल्यानंतर या महिलेला बाहेरून देण्यात आलेल्या प्राणवायूचे प्रमाणही कमी करण्यात आले...
25 May 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, May 8th, 2021
नवी दिल्ली, ८ मे – देशभरात कोरोनाचा कहर सुरू असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात् डीआरडीओने विकसित केलेल्या कोरोनावरील औषधाचा भारतीय औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) आपत्कालीन वापर करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे कोरोनाविरोधी लढ्याला आणखी बळकटी मिळणार आहे. डीआरडीओच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लियर मेडिसिन ऍण्ड अलाईड सायन्सेस आणि हैदराबाद सेंटर फॉर सेल्युलर ऍण्ड मॉलिक्युलर बायोलॉजी यांनी एकत्र येऊन या औषधाची निर्मिती केली आहे. या औषधाला...
8 May 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, April 26th, 2021
नवी दिल्ली, २५ एप्रिल – भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रो लवकरच ‘डेटा रिले’ उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. हा उपग्रह प्रक्षेपणानंतर गगनयान मिशनशी संपर्क साधण्यास मदत करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. गगनयान मिशनच्या अंतिम टप्प्यापूर्वीच हा उपग्रह प्रक्षेपित केला जाईल, जो ‘लोअर अर्थ ऑर्बिट’ (एलईओ) वर अंतराळवीर पाठवेल. मानवरहित मिशनचा पहिला टप्पा डिसेंबरमध्ये सुरू होणार आहे. आम्ही आमचा स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विचार करीत आहोत, जो पहिल्या मानवी अवकाश उड्डाणास...
26 Apr 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, April 15th, 2021
नवी दिल्ली, १५ एप्रिल – भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम गगनयानसंंबंधी सहकार्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रो आणि फ्रान्सच्या अंतराळ संस्थेच्या वतीने गुरुवारी एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या कराराची घोषणा भारत दौर्यावर असलेले फ्रान्सचे परराष्ट्र व्यवहार मंत्री विदेश मंत्री ज्यॉं इव ली द्रीयॉं यांनी इस्रोच्या मुख्यालयात केली. इस्रोने फ्रान्सची अंतराळ संस्था सेंटर नॅशनल डीइट्युड्स स्पेतियल्सला (सीएनईएस) गगनयान मोहिमेसाठी मदत करण्याची सूचना केली आहे. यावर सीएनईएसने भारताच्या फ्लाईट फिजिशियन...
15 Apr 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, March 1st, 2021
इस्रोने घडविला इतिहास, बंगळुरू, २८ फेब्रुवारी – श्रीहरीकोटातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ऍमाझोनिया-१ आणि इतर १८ उपग्रह वाहून नेणार्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन-सी५१चे (पीएसएलव्ही-५१) यशस्वी रीत्या प्रक्षेपण करून इस्रोने आणखी एक इतिहास घडविला आहे. या प्रक्षेपणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यात श्रीमद्भगवद्गीता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्रही अंतराळात पाठविण्यात आले आहे. या उपग्रहांसोबतच पंतप्रधानांचे छायाचित्रही आकाशात फिरणार आहे. २०२१ मधील इस्रोचे हे पहिले प्रक्षेपण आहे. आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या अंतराळ मोहिमांपैकी...
1 Mar 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, February 23rd, 2021
एकाचवेळी १०० लक्ष्यांवर नजर ठेवण्यास सक्षम, बंगळुरू, २३ फेब्रुवारी – हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) १२३ तेजस लढाऊ विमानांचा पुरवठा भारतीय वायुदलाला करणार असून, यातील निम्म्या विमानांसाठी स्वदेशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेली ‘उत्तम’ रडार यंत्रणा वापरली जाणार आहे. पहिल्या तुकडीतील विमानांसाठी इस्रायली रडार वापरले जाणार आहे. यानंतर स्वदेशी उत्तम रडार यंत्रणा वापरली जाणार आहे. एकाचवेळी १०० लक्ष्यांवर नजर ठेवण्यास हे रडार सक्षम आहे. भारतीय वायुदलाला एकूण १२३ तेजस लढाऊ विमाने...
23 Feb 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, February 21st, 2021
नवी दिल्ली, २१ फेब्रुवारी – भारताची चंद्रावरील तिसरी बहुप्रतीक्षित मोहीम चांद्रयान-३ मोहीम २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात आली, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्त्रो) प्रमुख के. सिवन् यांनी दिली. कोरोना काळातील टाळेबंदीमुळे इस्त्रोच्या चांद्रयान-३ आणि देशातील प्रथम मानवनिर्मित गगनयान अंतराळ मोहिमेसह अनेक मोहिमांना फटका बसला. २०२० सालीच या मोहिमा राबविण्यात येणार होत्या. आम्ही चांद्रयान-३ वर काम करीत असून, याचे स्वरूप चांद्रयान-२ सारखेच असणार आहे. केवळ या यानामध्ये ऑर्बिटरचा समावेश नसेल,...
21 Feb 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, February 17th, 2021
चेन्नई, १७ फेब्रुवारी – अंतराळ क्षेत्रातील अग्निकुल कॉसमॉस ही भारतीय स्टार्ट-अप कंपनी पूर्णतः थ्रीडी रॉकेट इंजीन विकसित करणारी जगातील पहिली कंपनी ठरली असून, एकच इंजीन असलेल्या या रॉकेटची लवकरच चाचणी घेतली जाणार आहे. सध्या ही कंपनी लहान उपग्रह प्रक्षेपित करणारे अग्निबाण नावाचे पहिले खाजगी प्रक्षेपण वाहन तयार करीत आहे. अग्निकुल कंपनीने अग्निलेट नावाचे सेमी क्रायोजेनिक इंजीनची यापूर्वी यशस्वी चाचणी घेतली आहे. अग्निकुलने तयार केलेले रॉकेट इंजीन अनोखे असून, ते एकाचवेळी...
17 Feb 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, February 12th, 2021
बंगळुरू, १२ फेब्रुवारी – भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रोने भारताच्या पाच दशकांच्या अंतराळ कार्यक्रमांदरम्यान प्रथमच खाजगी कंपन्यांच्या दोन आणि एका शैक्षणिक उपग्रहाच्या चाचणीसाठी येथील यू. आर. राव उपग्रह केंद्र (यूआरएससी) उपलब्ध करून दिले आहे. श्रीहरीकोटा येथील स्पेसपोर्ट आणि थिरुवनंतपूरम् येथील रॉकेट सेंटर पुढील काही महिन्यांसाठी दोन खाजगी कंपन्यांना उपलब्ध करून दिले आहे. या कंपन्या येथे इंजीनची चाचणी घेत आहे. नकाशा सेवेसाठी इस्रो या कंपन्यांना लवकरच उपग्रहीय छायाचित्रे उपलब्ध करून...
12 Feb 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, January 25th, 2021
भुवनेश्वर, २५ जानेवारी – आधुनिक पिढीतील जमिनीवरून हवेत मारा करणार्या आकाश क्षेपणास्त्राची संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) ओडिशातील तटवर्ती भागात आज सोमवारी चाचणी यशस्वी चाचणी घेतली आहे. हवेतून होणारा वेगवान क्षेपणास्त्र आणि विमानहल्ल्यांचा धोका परतवण्यासाठी डीआरडीओने भारतीय वायुदलाकरिता हे आधुनिक पिढीतील क्षेपणास्त्र विकसित केले आहे. संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी चाचणीतील सहभागी डीआरडीओचे संशोधकांचे अभिनंदन केले. डीआरडीओ, भारत डायनामिक्स लिमिटेड (बीडीएल), दारूगोळा आणि क्षेपणास्त्र उत्पादक आणि सार्वजनिक क्षेत्रातील भारत इलेक्ट्रॉनिक्स...
25 Jan 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, December 20th, 2020
बंगळुरू, २० डिसेंबर – इस्रोला आगामी दहा वर्षांच्या विशेष कृती आराखड्याची आवश्यकता आहे. याशिवाय, अंतराळ आणि हवाई क्षेत्र एकत्र आणून चीनप्रमाणेच मोठे यश संपादन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रख्यात वैज्ञानिक जी. माधवन् नायर यांनी आज रविवारी येथे केले. इस्रोच्या बंगळुरू मुख्यालयाने अशा प्रकारचा कृती आराखडा फार आधीच तयार करायला हवा होता, पण त्यात यश आले नाही. इस्रोने आता दीर्घकालीन दृष्टिकोनातून स्वत:ला सज्ज ठेवायला हवे. मोठ्या यशासाठी भविष्याकडे पाहणार्या धोरणाची...
20 Dec 2020 / No Comment / Read More »