Posted by वृत्तभारती
Thursday, December 17th, 2020
आपत्ती व्यवस्थापनात सहकार्य होणार, श्रीहरिकोटा, १७ डिसेंबर – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) आज सतीश धवन अंतराळ केंद्रावरून देशाचा ४२ वा संप्रेषण उपग्रह अवकाशात सोडला. हा उपग्रह आपत्ती व्यवस्थापन आणि आंतरजाल पुरवठा अर्थात इंटरनेट कनेक्टिव्हीटीसाठी मदत करणार आहे. विशेष म्हणजे भारताच्या वतीने कोरोना महामारीच्या काळात केलेले हे दुसरे प्रक्षेपण आहे. सूत्रानुसार, संप्रेषण उपग्रह सीएमएस-०१ पीएसएलव्ही-सी ५० रॉकेटद्वारे प्रक्षेपण करण्यासाठी काल बुधवारी सुमारे २५ तासांची उलटी मोजणी सुरू करण्यात आली होती....
17 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, December 7th, 2020
बंगळुरू, ७ डिसेंबर – कोरोना महामारीमुळे भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम गगनयान ही वर्षभर लांबणीवर पडली आहे, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) अधिकार्यांनी आज सोमवारी दिली. पहिल्या मानवी गगनयान मोहिमेच्या तयारीसाठी सर्वप्रथम दोन मानवरहित मोहिमा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार डिसेंबर २०२० आणि जुलै २०२१ मध्ये या मोहिमा आयोजित करण्यात आल्या होत्या आणि डिसेंबर २०२१ मध्ये पहिल्या मानवी मोहिमेचे आयोजन केले जाणार होते. मात्र, आता ही मोहीम लांबणीवर...
7 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, December 2nd, 2020
नवी दिल्ली, १ डिसेंबर – भारताने आपल्या सर्वाधिक घातक अशा ब्रह्मोस सुपरसोनिक क्रुझ क्षेपणास्त्राची मंगळवारी बंगालच्या खाडीत यशस्वी चाचणी घेतली. हे सुपरसोनिक क्रुझ क्षेपणास्त्र आयएनएस रणविजयवरून डागण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली. यापूर्वी झालेल्या तीन चाचण्या जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या होत्या. हे क्षेपणास्त्र नौदलाच्या आयएनएस रणविजयवरून डागण्यात आले आणि अंदमान-निकोबार बेट व अन्य निर्मनुष्य बेटावरील लक्ष्याचा या क्षेपणास्त्राने अचूक वेध घेतला, अशी माहिती सूत्रांनी दिली. चीनसमवेत जवळजवळ ८-९...
2 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, November 23rd, 2020
नवी दिल्ली, २२ नोव्हेंबर – समुद्रात खोलवर दडलेले खनिज, ऊर्जा स्रोत आणि सागरी वैविध्यांचा शोध घेण्यासाठी भारत येत्या तीन ते चार महिन्यांत मोठी मोहीम हाती घेणार आहे. ज्या भागात संशोधन झाले नाही, अशा ठिकाणी ही मोहीम राबवली जाणार आहे, अशी माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकार्याने दिली. भविष्यात मोठी कलाटणी देण्याची क्षमता असलेल्या या मोहिमेसाठी आवश्यक परवागन्या घेतल्या जात आहेत. ही मोहीम येत्या तीन ते चार महिन्यांत सुरू होईल,...
23 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 7th, 2020
श्रीहरीकोटा, ७ नोव्हेंबर – मातृभूमीची सुरक्षा करतानाच, शत्रूंच्या भूमितील देशविरोधी कारवायांवरही लक्ष ठेवण्याची क्षमता असलेल्या ईओएस-०१ या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रोने आज शनिवारी यशस्वी प्रक्षेपण केले. या उपग्रहासोबतच इस्रोने अन्य नऊ विदेशी उपग्रहही अंतराळातील त्यांच्या निर्धारित कक्षांत पोहोचविले. एकाचवेळी दहा उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करून इस्रोने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रावरून आज दुपारी ३ वाजून १२ मिनिटांनी या...
7 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 7th, 2020
बंगळुरू, ६ नोव्हेंबर – नागरी आणि धोरणात्मक वापरासोबतच शत्रूंच्या भूमीवर होणार्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी उपयुक्त असलेल्या पृथ्वी निरीक्षण उपग्रहासह एकूण १० उपग्रहांचे प्रक्षेपण भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रो उद्या शनिवारी करणार आहे. कोरोना महामारीमुळे मार्च महिन्यापासून इस्रोच्या मोहिमा थांबल्या असून, त्यानंतरची ही पहिलीच मोहीम आहे. ईओएसओ-१ आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांचे ९ उपग्रह ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (पीएसएलव्ही) प्रक्षेपित करेल. यातील चार उपग्रह अमेरिका, जर्मनीचे चार आणि लुथियानाचा एक उपग्रह आहे....
7 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, April 2nd, 2019
•पीएसएलव्ही-सी ४५ ची ४७ वी मोहीम फत्ते, श्रीहरिकोटा, १ एप्रिल – इस्रोच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून पीएसएलव्ही सी-४५ या रॉकेटचे आज सोमवारी सकाळी ९.२७ वाजता प्रक्षेपण करण्यात आले. या प्रक्षेपणासह भारताचा लष्करी उपग्रह एमिसॅट आणि २८ विदेशी उपग्रह अंतराळात पाठवून भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अतिशय कठीण स्वरूपाची ही मोहीम इस्रोने फत्ते केली आहे. पीएसएलव्ही-सी ४५ ने आपल्या ४७ व्या मोहिमेत ४३६ किलो वजनाच्या एमिसॅटसह लिथुनिया, स्पेन, स्वित्झर्लण्ड...
2 Apr 2019 / No Comment / Read More »