किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, २२ नोव्हेंबर – समुद्रात खोलवर दडलेले खनिज, ऊर्जा स्रोत आणि सागरी वैविध्यांचा शोध घेण्यासाठी भारत येत्या तीन ते चार महिन्यांत मोठी मोहीम हाती घेणार आहे. ज्या भागात संशोधन झाले नाही, अशा ठिकाणी ही मोहीम राबवली जाणार आहे, अशी माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकार्याने दिली.
भविष्यात मोठी कलाटणी देण्याची क्षमता असलेल्या या मोहिमेसाठी आवश्यक परवागन्या घेतल्या जात आहेत. ही मोहीम येत्या तीन ते चार महिन्यांत सुरू होईल, असे मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन् यांनी सांगितले. या मोहिमेसाठी चार हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे. भारतातील विशाल आर्थिक केंद्र शोधण्याच्या प्रयत्नांना यामुळे बळकटी मिळणार आहे, असे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.
खोल समुद्रातील विविध उपक्रमांसाठी तंत्रज्ञान विकासाचा समावेशही या मोहिमेत करण्यात आला, अशी माहिती राजीवन् यांनी दिली. हा शिस्तबद्ध कार्यक्रम पृथ्वी विज्ञान मंत्रालय हाती घेणार असून, संरक्षण संशोधन विकास संस्था (डीआरडीओ), जैवतंत्रज्ञान विभाग, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो), वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) या मोहिमेतील भागीदार राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या मोहिमेसाठी वापरले जाणारे काही तंत्रज्ञान इस्रो आणि डीआरडीओसारख्या संस्थांनी विकसित केले आहे. अशा प्रकारच्या मोहिमांसाठी उपयुक्त असलेल्या पाणबुड्यांची रचना, विकास आणि त्याचे प्रदर्शन हा देखील या मोहिमेतील एक पैलू आहे, अशी माहिती मंत्रालयाच्या एका अधिकार्याने दिली. भारतीय सामुद्री क्षेत्रात चीन, कोरिया, जर्मनीसारखे देश सक्रिय असून, या भागात भारताची उपस्थिती वाढवण्याचा उद्देश देखील या मोहिमेमागे आहे.