किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, १ डिसेंबर – भारताने आपल्या सर्वाधिक घातक अशा ब्रह्मोस सुपरसोनिक क्रुझ क्षेपणास्त्राची मंगळवारी बंगालच्या खाडीत यशस्वी चाचणी घेतली. हे सुपरसोनिक क्रुझ क्षेपणास्त्र आयएनएस रणविजयवरून डागण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली. यापूर्वी झालेल्या तीन चाचण्या जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या होत्या.
हे क्षेपणास्त्र नौदलाच्या आयएनएस रणविजयवरून डागण्यात आले आणि अंदमान-निकोबार बेट व अन्य निर्मनुष्य बेटावरील लक्ष्याचा या क्षेपणास्त्राने अचूक वेध घेतला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
चीनसमवेत जवळजवळ ८-९ महिन्यांपासून सुरू असलेल्या सीमावादाच्या पृष्ठभूमीवर मागील काही दिवसांत भारताने अनेक क्षेपणास्त्रे, पाणतीर तसेच क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेची यशस्वी चाचणी घेतली आहे.
क्षेपणास्त्राची मारक क्षमता व पल्ला वाढविणे हा आजच्या चाचणीचा हेतू होता. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र आता ४०० किलोमीटरवरील लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकणार आहे.
ब्रह्मोस क्षेपणास्त्र २८ फूट लांब असून, त्याचे वजन ३००० किलो आहे. यावर २०० किलो पारंपरिक स्फोटके वाहून नेली जाऊ शकतात. आज चाचणी घेतलेले ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र ३०० ते ८०० किलोमीटर अंतरावरील शत्रूच्या लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकते. या क्षेपणास्त्राच्या प्रचंड गतीमुळे हे अतिशय घातक सिद्ध होते. हे क्षेपणास्त्र ताशी ४३०० किलोमीटर वेगाने शत्रूवर हल्ला करू शकते. म्हणजेच १.२० किलोमीटर प्रति सेकंद एवढा याचा प्रचंड वेग आहे. एकदा हे क्षेपणास्त्र झेपावले, तर शत्रूला यातून वाचण्याची संधीही मिळत नाही.
हे क्षेपणास्त्र रशिया आणि भारताने मिळून विकसित केले आहे. भारताकडून हे क्षेपणास्त्र खरेदी करण्याची व्हिएतनामची इच्छा होती. मात्र, यात रशियाचा अडथळा होता, असे सांगण्यात येत होते. पण, आता हे क्षेपणास्त्र निर्यात करण्याची परवानगी रशियाने भारताला दिली आहे. त्यामुळे आता व्हिएतनामला क्षेपणास्त्राची निर्यात करणे भारताला शक्य होणार आहे. त्यामुळे आता दक्षिण चीन समुद्रात चीनला थोडे सांभाळूनच राहावे लागेल.
व्हिएतनाम भारताकडू ब्रह्मोस आणि आकाश क्षेपणास्त्र खरेदी करू इच्छितो. जर हा व्यवहार व्यवस्थित मार्गी लागला, तर व्हिएतनाम ही दोन्ही क्षेपणास्त्रे स्वत:च्या सुरक्षेसाठी तैनात करेल, हे निश्चित आहे, असे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे.