किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलबंगळुरू, ७ डिसेंबर – कोरोना महामारीमुळे भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम गगनयान ही वर्षभर लांबणीवर पडली आहे, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) अधिकार्यांनी आज सोमवारी दिली.
पहिल्या मानवी गगनयान मोहिमेच्या तयारीसाठी सर्वप्रथम दोन मानवरहित मोहिमा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार डिसेंबर २०२० आणि जुलै २०२१ मध्ये या मोहिमा आयोजित करण्यात आल्या होत्या आणि डिसेंबर २०२१ मध्ये पहिल्या मानवी मोहिमेचे आयोजन केले जाणार होते. मात्र, आता ही मोहीम लांबणीवर पडली आहे, असे इस्रोचे अध्यक्ष के. सिवन् यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
ही मोहीम पुढील किंवा त्यानंतरच्या वर्षात आयोजित करण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे, असे त्यांनी प्रस्तावित दोन मानवरहित मोहिमांच्या आयोजनाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
पृथ्वीच्या खालच्या कक्षेत तीन अंतराळवीरांना पाठवून भारतीय क्षमता जाहीर करण्याच्या उद्देशाने ही मानवी मोहीम हाती घेतली आहे. या मानवी मोहिमेसाठी जीएसएलव्ही-एमके-३ या प्रक्षेपकाचा वापर केला जाईल, असे मागील महिन्यात इस्रोने स्पष्ट केले होते. घन इंधनाचा वापर करून तयार करण्यात आलेले एस-२०० बुस्टर हे जीएसएलव्ही-मेक ३ मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. मानवी मोहीम लक्षात घेऊन, या रॉकेट बुस्टरमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यातील पहिल्या महत्त्वपूर्ण बुस्टरच्या मोटारीचा व्यास ३.२ मीटर आणि लांबी ८.५ मीटर राहणार आहे तसेच याचे बजन ५.५ टन आहे. हे उपकरण स्वदेशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लार्सन ऍण्ड टुब्रोने तयार केले आहे. मानवरहित मोहिमेची हा पहिला मोठा टप्पा आहे, अशी माहिती इस्रोच्या अधिकार्याने दिली.
चांद्रयान-३ मोहिमेचे काम देखील प्रगतीपथावर आहे. सध्या लॅण्डर आणि रोव्हरवर काम केले जात आहे. यासाठी आम्ही अद्याप वेळापत्रक तयार केलेले नाही, असे सिवन् यांनी सांगितले.