किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलश्रीहरीकोटा, ७ नोव्हेंबर – मातृभूमीची सुरक्षा करतानाच, शत्रूंच्या भूमितील देशविरोधी कारवायांवरही लक्ष ठेवण्याची क्षमता असलेल्या ईओएस-०१ या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रोने आज शनिवारी यशस्वी प्रक्षेपण केले. या उपग्रहासोबतच इस्रोने अन्य नऊ विदेशी उपग्रहही अंतराळातील त्यांच्या निर्धारित कक्षांत पोहोचविले.
एकाचवेळी दहा उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करून इस्रोने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रावरून आज दुपारी ३ वाजून १२ मिनिटांनी या सर्व उपग्रहांना घेऊन पीएसएलव्ही-सी४९ हे अत्याधुनिक प्रक्षेपक अंतराळात निघाले. यासाठी २६ तासांची उलटगणना शुक्रवारी सायंकाळी सुरू करण्यात आली होती. या प्रक्षेपणासाठी ३ वाजून ०२ मिनिटांची वेळ निर्धारित करण्यात आली होती, पण पावसामुळे दहा मिनिटांचा विलंब झाला, अशी माहिती इस्रोने दिली.
इस्रोने केलेली यावर्षीची ही पहिलीच कामगिरी ठरली आहे. कोरोना संकटामुळे यावर्षीच्या सुरुवातीला आखण्यात आलेल्या सर्व मोहिमा लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या.
या क्षेत्रांत होणार मोठी मदत
पृथ्वी उपग्रहावर बसविण्यात आलेल्या सिंथेटिक अपर्चर रडारच्या माध्यमातून दिवसा व रात्रीही शत्रूंच्या हालचालीवर नजर ठेवणे शक्य होणार आहे. ढगांचे अडथळे असतानाही त्याला भेदून, हा उपग्रह चांगल्या प्रतीचे छायाचित्र घेण्यासाठी सक्षम आहे. यामुळे लष्कराला त्याची मोठी मदत होणार आहे. याशिवाय कृषी, भूविज्ञान, समुद्र किनारे व अन्य क्षेत्रातही सुरक्षा मजबूत करण्यासाठी या उपग्रहाचा उपयोग होणार आहे.