किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलआपत्ती व्यवस्थापनात सहकार्य होणार,
श्रीहरिकोटा, १७ डिसेंबर – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) आज सतीश धवन अंतराळ केंद्रावरून देशाचा ४२ वा संप्रेषण उपग्रह अवकाशात सोडला. हा उपग्रह आपत्ती व्यवस्थापन आणि आंतरजाल पुरवठा अर्थात इंटरनेट कनेक्टिव्हीटीसाठी मदत करणार आहे. विशेष म्हणजे भारताच्या वतीने कोरोना महामारीच्या काळात केलेले हे दुसरे प्रक्षेपण आहे.
सूत्रानुसार, संप्रेषण उपग्रह सीएमएस-०१ पीएसएलव्ही-सी ५० रॉकेटद्वारे प्रक्षेपण करण्यासाठी काल बुधवारी सुमारे २५ तासांची उलटी मोजणी सुरू करण्यात आली होती. श्रीहरिकोटा येथील द्वितीय प्रक्षेपण कें द्रातून दुपारी ३ वाजून ४१ मिनिटांनी पीएसएलव्ही-सी ५० रॉकेटने अवकाशात उड्डाण केले. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानासंबंधी (पीएसएलव्ही) आजची ही महत्त्वपूर्ण मोहीम आहे. हा उपग्रह भारताची मुख्य भूमी, अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीपला व्यापणार्या फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रमच्या विस्तारित सी बँडमध्ये सेवा प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. हा उपग्रह आकाशात झेपावण्यासाठी अनेक दिवसांपासून वाट पाहत होता. मात्र, बंगालच्या खाडीमधील खराब हवामानामुळे उड्डाणासाठी परवानगी देण्यात येत नव्हती, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, हा उपग्रह अंतराळात सात वर्षांपर्यंत कार्यरत असेल. तसेच, तो सॅटेलाईट जीसॅट-१२ ची जागा घेईल, जो सन २०११ मध्ये प्रक्षेपित करण्यात आला होता. सीएमएस-सी ५० चे प्रक्षेपण ही सन २०२० मधील शेवटची अंतराळ मोहीम आहे.