किमान तापमान : 29.09° से.
कमाल तापमान : 32.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 52 %
वायू वेग : 6.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
32.99° से.
27.3°से. - 32.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.85°से. - 31.56°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.12°से. - 31.57°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.41°से. - 30.38°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.74°से. - 30.38°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.37°से. - 29.74°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादलनवी दिल्ली, ८ मे – देशभरात कोरोनाचा कहर सुरू असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात् डीआरडीओने विकसित केलेल्या कोरोनावरील औषधाचा भारतीय औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) आपत्कालीन वापर करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे कोरोनाविरोधी लढ्याला आणखी बळकटी मिळणार आहे.
डीआरडीओच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लियर मेडिसिन ऍण्ड अलाईड सायन्सेस आणि हैदराबाद सेंटर फॉर सेल्युलर ऍण्ड मॉलिक्युलर बायोलॉजी यांनी एकत्र येऊन या औषधाची निर्मिती केली आहे. या औषधाला २-डिऑक्सी-डी-ग्लुकोज (२-डीजी) असे नाव देण्यात आले आहे. या औषधाच्या उत्पादनाची जबाबदारी हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लॅबकडे सोपविण्यात आली आहे, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने आज शनिवारी जारी केलेल्या निवेदनातून दिली.
या औषधाची मानवी चाचणी प्रचंड यशस्वी झाली आहे. हे औषध घेतल्यानंतर रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधितांच्या प्रकृती झपाट्याने सुधारणा झाल्याचे दिसून आले असून, बाधितांना पुरवणी प्राणवायूचीही आवश्यकता भासली नाही, अशी दिलासादायक माहिती यात देण्यात आली.
डीआरडीओच्या वैज्ञनिकांनी मागील वर्षी एप्रिलमध्ये या औषधावर काम सुरू केले होते. कोरोनावर हे औषध अत्यंत प्रभावशाली असल्याचे वैज्ञानिकांच्या लक्षात आले. या आधारावर डीसीजीआयने या औषधाच्या दुसर्या टप्प्यातील चाचणीला मंजुरी दिला होती. या औषधाच्या चाचणीचा पहिला टप्पा सहा रुग्णालयांमध्ये घेण्यात आला. त्यानंतर ११ रुग्णालयांमध्ये औषधाच्या मात्रेची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. तर, दुसर्या टप्प्यात ११० बाधितांवर या औषधाची चाचणी घेण्यात आली. या सर्वच चाचण्या मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरल्या, असे यात नमूद आहे.
कमी वेळेत कोरोनावर मात
हे औषध पावडरच्या स्वरूपात विकसित करण्यात आले असून, पाण्यात मिसळवून ते तोंडावाटे शरीरात सोडले जाते. सध्या उपलब्ध असलेल्या इतर उपचार पद्धतीच्या तुलनेत २-डीजी औषधाच्या वापराने बाधित कमी वेळेत कोरोनावर मात करीत आहेत.