किमान तापमान : 24.59° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 50 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.59° से.
23.83°से. - 25.97°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलसेवा भारतीतर्फे ४५० खाटांचे विलगीकरण केंद्र, विहिंपतर्फे भोजन व्यवस्था,
नवी दिल्ली, ९ मे –
सेवा है यज्ञकुंड समिधा सम हम जले
ध्येय महासागर में सरित रूप हम मिले
लोकयोगक्षेम ही राष्ट्र अभय गान है
सेवारत व्यक्ती व्यक्ती कार्य का ही प्राण है
वरीलप्रमाणे सेवेचे, समर्पणाचे गीत गात, ‘शिवभावे जीवसेवा’ हा स्वामी विवेकानंदांचा संदेश डोळ्यापुढे ठेवून राष्ट्री०य स्वयंसेवक संघ व परिवारातील सेवा भारती, विश्व हिंदू परिषद आणि भारतीय मजदूर संघ इत्यादी संघटना कोरोनाच्या या राष्ट्रीय संकटकाळात लोकांच्या मदतीसाठी तत्परतेने धावून आल्या आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दिल्लीत यावेळी ४५० खाटांचे विलगीकरण केंद्र चालवत आहे. आता याचा विस्तार करण्याची योजना असून, लवकरच त्याची क्षमता हजार खाटांपर्यंत वाढविण्यात येईल. तसेच, सेवा भारती आणि विश्व हिंदू परिषद सर्व प्रांतांमध्ये गरीब लोकांना कडधान्य, तयार भोजनाचे पॅकेट्स आणि अन्य वैद्यकीय मदत उपलब्ध करून देत आहे.
सध्या सेवा भारतीतर्फे अशोक विहार, उदासीन आश्रम, नरेला, द्वारका, हरिनगर आणि लाजपत जिल्ह्यातील अमर कॉलनी इत्यादी सहा विलगीकरण केंद्र संचालित करण्यात येत आहेत व लवकरच आणखी नऊ विलगीकरण केंद्रे सुरू करण्यात येतील, असे दिल्ली प्रांत प्रचार प्रमुख रीतेश अग्रवाल यांनी सांगितले. या विलगीकरण केंद्रांच्या माध्यमातून जवळपास ४५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
प्रशासनाकडून प्राणवायूची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर एक हजार खाटांच्या विलगीकरण केंद्राची योजनाही आखण्यात आल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. सर्व विलगीकरण केंद्रांवर प्राणवायू उपलब्ध करून देण्यात येत आहे. बहुतांश केंद्रात सिलेंडरच्या माध्यमातून वैद्यकीय प्राणवायूचा पुरवठा करण्यात येत आहे, तर अनेक केंद्रांत प्राणवायू कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
लाजपत नगरच्या सरस्वती बाल मंदिरात ३५ खाटांची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. लवकरच याची क्षमता ५० खाटांपर्यंत वाढविण्यात येईल. अशोक विहार येथे १०० खाटांचे कोविड केअर केंद्र चालविण्यात येत आहे. लवकरच याचीही क्षमता २०० खाटांपर्यंत वाढविण्यात येईल. याशिवाय श्री गुरू रामराय उदासीन आश्रम व नरेला येेथेही प्रतयेकी ३३ व १३ खाटांचे विलगीकरण केंद्र उभारण्यात आले आहे.
रा. स्व. संघाशी जुळलेले डॉक्टर्स, परिचारिका आणि अन्य सेवाव्रती कार्यकर्ते या केंद्रांत लोकांची सर्वप्रकारची सेवा करीत आहेत. या सर्वांवर यशस्वी उपचार करून त्यांच्या शारीरिक आरोग्याचीच नव्हे, तर मानसिक आरोग्याचीही काळजी घेण्यात येत आहे. त्यांच्या समुपदेशनाची व्यवस्थाही करण्यात येत आहे.
विहिंपचे सेवाकार्य
विश्व हिंदू परिषद देखील या कोरोना संकटकाळात लोकांच्या सेवेसाठी धावून आली आहे. दिल्ली प्रांतात संघटनेच्या दृष्टीने निर्मित सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या कुटुंबांवर उपजीविकेचे संकट कोसळले आहे त्यांना या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मदत केली जात आहे. विहिंपतर्फे दिल्ली प्रांतातील सर्व पीडित कुटुंबीयांना कडधान्य, तयार भोजन व अन्य वैद्यकीय मदत देण्यात येत आहे.
अन्त्यसंस्कारासाठी कार्यकर्त्यांची विशेष चमू
कार्यकर्त्यांची एक विशेष चमू स्मशान घाटावर तयार करण्यात आली आहे. हे कार्यकर्ते अशा मृतदेहांवर अन्त्यसंस्कार करण्यास मदत करीत आहेत ज्यांचे कुटुुंबीय काही कारणास्तव अन्त्यसंस्कारात सहभागी होऊ शकत नाही, असे विश्व हिंदू परिषदेचे दिल्ली प्रांत प्रमुख कपिल खन्ना यांनी माध्यमांना सांगितले.
भा. म. संघ करणार परिचारिकांचा सत्कार
जागतिक परिचारिका दिनी म्हणजे १२ मे रोजी भारतीय मजदूर संघ परिचारिका आणि अन्य आरोग्य कर्मचार्यांचा सन्मान करणार आहे. यासाठी भा. म. संघ राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांशी संवाद साधून आवश्यक माहिती गोळा करीत आहे. ज्यांनी कोरोनाकाळात पीडितांची सेवा करण्यास स्वत:ला झोकून दिले आहे, अशा परिचारिका व कर्मचार्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.