किमान तापमान : 28.91° से.
कमाल तापमान : 32.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 52 %
वायू वेग : 7.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
32.99° से.
27.62°से. - 32.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.21°से. - 31.2°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.54°से. - 31.18°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.65°से. - 30.02°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.41°से. - 29.99°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 29.32°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादलनवी दिल्ली, ९ मे – कोरोनाच्या संकटकाळात अनेकांना आपल्या नोकर्यांना मुकावे लागले होते. या पृष्ठभूमीवर माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी कॉग्निझंटने भारतात २०२१ या वर्षात २८ हजार जणांना नोकरीची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी म्हणजेच २०२० मध्ये या कंपनीकडून १७ हजार जणांना नोकरीची संधी देण्यात आली होती.
कॉग्निझंटमध्ये सध्या २ लाख ९६ हजार ५०० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी एकट्या भारतात २ लाखांहून अधिक कर्मचारी आहेत. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन हम्फ्रीज यांनी या संदर्भात माहिती दिली. मागील काही महिन्यांमध्ये आलेल्या राजीनाम्यांच्या धर्तीवर ही वाढ पाहायला मिळेल. कारण, भारतामध्ये नोटिस देण्याचा कालावधी २ महिन्यांचा होता. कंपनीतून राजीनामा देणार्यांची संख्या मोठी असली, तरीही आता येत्या काळात नव्याने मोठ्या संख्येने नवोदितांना या कंपनीत काम करण्याची संधी चालून येणार आहे.
कंपनीच्या सीईओंनी दिलेल्या माहितीप्रमाणे सध्या कॉग्निझंटकडून विविध योजनांवर काम सुरू आहे. यामध्ये अंतर्गत व्यवस्थापन, प्रशिक्षण उपक्रम, जॉब रोटेशन आणि अंतर्गत संधींमध्ये वाढ असे अनेक पर्याय कर्मचार्यांसाठी खुले असतील. या माध्यमातून मनुष्यबळावरही कंपनी मोठी गुंतवणूक करणार आहे. याशिवाय तिमाही पगारवाढ आणि पद बढती, उच्च कौशल्य मागणी अशा उपाययोजनाही अंमलात आणण्यात येणार आहेत. अनेक चांगल्या कर्मचार्यांनी कंपनीकडे पाठ फिरवल्यामुळे पहिल्या तिमाहीत कंपनीला मोठ्या प्रमाणात फटका बसला. यासाठीच आता पुन्हा नव्याने या क्षेत्रात प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्यासाठी कॉग्निझंटकडून इतक्या मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.