किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 26.46° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.46° से.
23.58°से. - 26.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलनौदलप्रमुखांची पंतप्रधानांकडे विनंती,
नवी दिल्ली, ९ मे – भारत-प्रशांत क्षेत्रात दबदबा निर्माण करण्यासाठी अणुऊर्जेवरील सहा पाणबुड्यांची निर्मिती करण्यात यावी, अशी विनंती नौदलाने केंद्र सरकारला केली आहे. नौदल प्रमुख ऍडमिरल करमबीरसिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत नौदलाच्या ऑपरेशन समुद्र सेतू-२ विषयी चर्चा करताना उपरोक्त विनंती केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अणुशक्तीवर चालवल्या जाणार्या पाणबुड्यांमुळे भारतीय नौदल भारत-प्रशांत क्षेत्रात गस्त घालू शकेल. केवळ भारत-प्रशांतच नव्हे, तर भविष्यात आर्क्टिक मार्गावरही लक्ष ठेवावे लागणार आहे. बर्फ वितळल्यामुळे हा मार्ग लवकरच उघडणार आहे, अशी माहिती एका अधिकार्याने दिली. चिनी नौदलाच्या ताकदीचा सामना करण्यासाठी भारत सज्ज आहे. अणुऊर्जेवर चालणार्या पाणबुडीची ही योजना हा त्यातील एक भाग आहे. युद्धनौकांच्या संख्येच्या बाबतीत चीनने अमेरिकी नौदलाला मागे टाकले आहे.
भारताकडे सध्या फक्त एक आण्विक पाणबुडी आहे. २०२५ पूर्वी आणखी एक भाडेतत्त्वावर घेतली जाण्याची शक्यता आहे. अन्नपुरवठा, इतर व्यूहरचना तसेच रसदीव्यतिरिक्त शस्त्रे आणि क्षेपणास्त्रांसह लांब पल्ल्यांच्या गस्तीसाठी आण्विक पाणबुडी आवश्यक आहे. त्यामुळे, भारतीय नौदल आता आण्विक पाणबुड्यांची संख्या वाढविण्यावर अधिक भर देत आहे.