किमान तापमान : 24.97° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 50 %
वायू वेग : 4.96 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.58°से. - 26.11°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.36°से. - 27.01°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश24.95°से. - 27.79°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.46°से. - 28.06°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.51°से. - 27.86°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.2°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी कुछ बादलनवी दिल्ली, ९ मे – कोरोना लसीच्या दोन मात्रा संपूर्ण संरक्षणाची हमी आहे. लसीची पहिली मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा मुळीच चुकवू नका. कोरोनापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी ती अवश्य घ्या, असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केले.
देशभरातच कोरोनाने थैमान घातले आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. लसीच्या पहिल्या मात्रेनंतर आपली प्रतिकारशक्ती वाढते. मात्र, दुसर्या लसीनंतर ती आणखी कितीतरी पटीने वाढत असते. त्यानंतर आपल्याला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला, तरीही त्याचे दुष्परिणाम दिसून येत नाही. विषाणूचा प्रतिकार करणे शक्य होते, असे हर्षवर्धन यांनी सांगितले.
पहिली मात्रा घेतल्यानंतर आता दुसर्या मात्रेची गरज नाही, असा विचारही मनात आणू नका. दोन्ही मात्रा विशिष्ट अंतराने घेतल्यानंतर आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्तीत मोठी वाढ होते आणि त्यामुळे कोरोनाच्या विषाणूविरोधात लढणे शक्य होते, असे ते म्हणाले.
दुसरी मात्रा घेणार्यांना प्राधान्य द्या
कोरोना लसीची दुसरी मात्रा घेणार्या नागरिकांना प्राधान्य द्या, असा निर्देश केंद्र सरकारने राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना आज रविवारी दिला. केंद्राकडून पुरविण्यात येणार्या लसींच्या एकूण मात्रांपैकी ७० टक्के मात्रा दुसर्यांदा लस घेणार्यांना व ३० टक्के मात्रा पहिल्यांदा लस घेणार्यांना दिल्या जाव्यात, अशी सूचना केंद्राने केली आहे.
१८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांच्या लसीकरणास अद्याप संपूर्ण क्षमतेने सुरुवात झालेली नाही. त्यामुळे, कोरोना लसीची दुसरी मात्रा घेणार्यांना प्राधान्य द्या व दिलेल्या मुदतीत लसीकरण पूर्ण करा, असे निर्देश केंद्राने दिले आहेत. देशात कोरोनाच्या दुसर्या लाटेने हाहाकार माजवला आहे. देशव्यापी लसीकरणामधील ४५ ते ६० व त्यावरील वयोगटातील नागरिकांचे पहिल्या मात्रेचे लसीकरण झाले असून, हे नागरिक दुसर्या मात्रेची प्रतीक्षा करीत आहेत. आरोग्य तज्ज्ञांनी तिसर्या लाटेची देखील शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे या वयोगटातील नागरिकांचे संपूर्ण लसीकरण झाल्यास तिसर्या लाटेचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रभावी लसीकरणच एकमेव उपाय असल्याने ज्यांना पहिली मात्रा देण्यात आली, त्यांना दुसरी मात्रा देखील दिली जावी, असा निर्देश केंद्र सरकारने दिला आहे.