किमान तापमान : 23.14° से.
कमाल तापमान : 23.43° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 51 %
वायू वेग : 4.26 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.14° से.
22.99°से. - 26.45°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश24.98°से. - 27.28°से.
शनिवार, 25 जानेवारी कुछ बादल25.48°से. - 28.18°से.
रविवार, 26 जानेवारी छितरे हुए बादल25.59°से. - 27.73°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.32°से. - 27.45°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल24.72°से. - 26.64°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादललसीकरणाच्या मुद्यावरून फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांकडून पंतप्रधान मोदींची पाठराखण,
नवी दिल्ली, ९ मे – भारतात कोरोना संसर्गाने भयावह वळण घेतलेले असतानाच, फ्रान्स या मित्रराष्ट्राने मात्र देशातील परिस्थिती सुधारेल, अशी आशा व्यक्त करीत, देशाच्या नेतृत्वाला दिलासा दिला आहे. भारत-युरोपियन युनियनच्या आभासी परिषदेत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉं यांनी २६ आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसमोर भारताला लसीकरणाच्या मुद्यावरून कुणीही शिकवण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले.
कोरोना परिस्थिती हाताळण्यात भारतातील नेतृत्व आणि सरकार अपयशी ठरल्याच्या मुद्यावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेकांनी भारताविषयी नाराजीचा सूर आळवला. लसीकरण मोहिमेत येणार्या अडचणींमुळेही अनेकांनी तीव्र निराशा व्यक्त केली, पण इतर कुणाकडूनही भारताला काहीही शिकविण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करीत, फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताकडून इतर राष्ट्रांना दिलेल्या लसी आणि अन्य वैद्यकीय मदतीची आठवण करून दिली.
लसींच्या पुरवठ्याबाबत भारताला कुणीही शिकवणुकीचे धडे देण्याची गरज नाही. भारताकडून लसींच्या रूपात इतर देशांना मानवतेच्या नात्याने मदत करण्यात आली.
सध्या हा देश कोणत्या परिस्थितीचा सामना करीत आहे, हे आपण सर्वजण जाणतो, असे ते म्हणाले. दूरदृश्य प्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या या परिषदेला जर्मनीच्या अँजेला मार्केल यांच्यासह इतरही दिग्गज प्रतिनिधींची उपस्थिती होती.
भारताची मैत्रिपूर्ण मदत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने पुन्हा एकदा महत्त्वाच्या मार्गाने संपूर्ण जगाचीच मदत केली. शेजारी आणि इतर विकसनशील देशांना लसींचा पुरवठा करण्यासोबतच काही देशांना कोरोना प्रतिबंधात्मक लस मोफतही उपलब्ध करून दिली. जग कोरोनाच्या भयावह संकटाशी लढा देत असताना भारताकडून ‘व्हॅक्सिन मैत्री’ या उपक्रमांतर्गत जवळपास ९५ देशांना मदतीचा हात देण्यात आला.
आतापर्यंत लाखोंच्या संख्येने लसींच्या मात्रा इराण, युगांडा, युक्रेन, सौदी अरब, दुबई, ब्राझील यासारख्या देशांना पुरविण्यात आल्या आहेत. सध्याच्या घडीला देशात कोरोना लसींची मागणी वाढल्यामुळे इतर देशांना होणारा लसींचा पुरवठा थांबविण्यात आला आहे.