किमान तापमान : 22.48° से.
कमाल तापमान : 23.45° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 52 %
वायू वेग : 2.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.48° से.
21.99°से. - 26.45°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश24.98°से. - 27.28°से.
रविवार, 26 जानेवारी कुछ बादल25.48°से. - 28.18°से.
सोमवार, 27 जानेवारी छितरे हुए बादल25.59°से. - 27.73°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.32°से. - 27.45°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल24.72°से. - 26.64°से.
गुरुवार, 30 जानेवारी टूटे हुए बादलडॉ. सतीश रेड्डी यांची दिलासादायक माहिती,
नवी दिल्ली, ९ मे – संरक्षण संशोधन आणि विकास परिषद अर्थात् डीआरडीओने विकसित केलेले कोरोनाविरोधी ‘२-डीऑक्सी-डी-ग्लूकोज’ (२-डीजी) हे औषध येत्या दोन दिवसांतच बाजारात येणार असल्याची दिलासादायक माहिती डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. सतीश रेड्डी यांनी आज रविवारी दिली.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीवरील विशेष मुलाखतीत डॉ. रेड्डी बोलत होते. डीआरडीओच्या या पावडर स्वरूपातील औषधाचा आपत्कालीन वापर करण्यास भारतीय औषध महानियंत्रकांनी दोन दिवसांपूर्वी मंजुरी दिली आहे. या औषधाच्या मानवी चाचण्या यशस्वी झाल्या असल्याने मंगळवारपर्यंत ते बाजारात उपलब्ध झालेले असेल, असे त्यांनी जाहीर केले.
आमचे हे औषध कोरोनाच्या बहुतांश लक्षणांचा नाश करेल आणि शरीरात विषाणूची वाढ होण्यापासूनही सुरक्षा देईल. देशभरातील सर्व रुग्णालयांमध्ये योग्य मात्रेत हे औषध उपलब्ध करण्यासाठी रूपरेषा तयार करण्यात येत आहे. आमचे पथकही यावर काम करीत आहेत, असे त्यांनी सांगितले.
शरीरातील प्राणवायूचे प्रमाण वाढविण्याची क्षमता या औषधात असल्याने कोरोनाबाधिताला अतिरिक्त प्राणवायूची आवश्यकता भासणार नाही. औषध घेतल्यानंतर कोरोनाबाधित तीन दिवसांतच बरा होईल, त्याला बाह्य प्राणवायूची गरज भासणार नाही, असेही ते म्हणाले.
सुरुवातीला १० हजार मात्रा
सुरुवातीला औषधाच्या किमान १० हजार मात्रा बाजारात येऊ शकतात. त्यानंतर लवकरच ते रुग्णालयांमध्ये उपलब्ध केले जाईल. मात्र, बाधितांनी हे औषध फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावे, असे डॉ. रेड्डी यांनी सांगितले.
डीआरडीओची प्रयोगशाळा असलेल्या न्युक्लिअर मेडिसिन ऍण्ड अलाईड सायन्सेसने डॉ. रेड्डीज लॅबसोबतच्या सहकार्याने या औषधाची निर्मिती केली आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधितांना हे पावडररूपी औषध पाण्यात मिसळून दिल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाली असल्याचे वैद्यकीय चाचणीत दिसून आले आहे.
कोरोनाविरोधी लढा बळकट होणार
हे औषध रुग्णालयांना उपलब्ध झाल्यानंतर देशाचा कोरोनाविरोधी लढा अधिक बळकट होणार आहे. देशात सध्या वापर होत असलेल्या लसींसोबत हे औषधही या लढ्यात आता सहभागी होणार असल्याने बाधित झटपट बरे होऊन घरी परततील आणि मृत्यूदरही कमी होईल. परिणामी सक्रिय बाधितांची संख्या नियंत्रणात येईल, असा विश्वास रेड्डी यांनी व्यक्त केला.