किमान तापमान : 29.24° से.
कमाल तापमान : 29.74° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 6.44 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.74° से.
27.62°से. - 29.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.31°से. - 30.78°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.42°से. - 30.77°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.62°से. - 29.71°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.24°से. - 29.69°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश26.06°से. - 29.32°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादलसर्वोच्च न्यायालयाकडून टास्क फोर्स गठित,
नवी दिल्ली, ८ मे – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि प्राणवायू व अत्यावश्यक औषधांचा तुटवडा यावर सातत्याने लक्ष ठेवून असलेल्या सर्वोच्च न्यायालयाने आज शनिवारी राज्यांना प्राणवायू व अत्यावश्यक औषधांचा सातत्यपूर्ण पुरवठा व्हावा, यासाठी १२ सदस्यांचा राष्ट्रीय कृती दल (टास्क फोर्स) गठित केला आहे.
याा टास्क फोर्सला केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्रालयाशी सल्लामसलत करण्याचे अधिकार असतील, तसेच आपल्या पद्धतीने काम करण्याचे स्वातंत्र्यही असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
या टास्क फोर्सद्वारे देशभरात वैद्यकीय प्राणवायूची आवश्यकता, उपलब्धता आणि वितरण या आधारावर मूल्यांकनाचे काम केले जाईल. राष्ट्रीय स्तरावर टास्क फोर्स स्थापन करण्यामागील उद्देश कोरोना महामारीत नागरिकांच्या आरोग्याची शास्त्रीय आणि विशिष्ट पद्धतीने काळजी घेणे हा आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
सध्याच्या स्थितीत समोर असलेल्या समस्यांवर तोडगा काढण्यात आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी असणार्यांना या टास्क फोर्सची मोठी मदत होणार आहे. हे टास्क फोर्स आता आणि भविष्यात पारदर्शक आणि व्यावसायिकरीत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी धोरण तयार करेल आणि सरकारलाही आवश्यक ते मार्गदर्शन करणार आहे.
१२ सदस्यांची नावे
डॉ. भवतोष विश्वास (आरोग्य विज्ञान विद्यापीठ, कोलकाता), डॉ. देवेंद्र राणा (अध्यक्ष, व्यवस्थापकीय मंडळ, सर गंगाराम रुग्णालय), डॉ. देवीप्रसाद शेट्टी (अध्यक्ष, नारायण हेल्थकेअर, बंगळुरू), डॉ. गगनदीप कांग (प्राध्यापक, ख्रिश्चियन मेडिकल कॉलेज), डॉ. जे. व्ही. पीटर (संचालक, ख्रिश्चियन मेडिकल कॉलेज, तामिळनाडू), डॉ. नरेश त्रेहन (अध्यक्ष, मेदांता हॉस्पिटल, गुरुग्राम), डॉ. राहुल पंडित, संचालक क्रिटिकल केअर, फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड) डॉ. जरीर उदवाडिया (सल्लागार, हिंदुजा हॉस्पिटल, ब्रीच कॅण्डी महाराष्ट्र), डॉ. सौमित्र रावत (यकृत प्रत्यारोपण विभाग प्रमुख, सर गंगाराम हॉस्पिटल), डॉ. शिवकुमार सरिन (हेपेटोलॉजी विभागाचे संचालक, दिल्ली) तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव आणि राष्ट्रीय कृती दलाचे संयोजक यांचा यात समावेश आहे. सरकारमधील हे दोघेही टास्क फोर्समध्ये पदसिद्ध सदस्य असतील.