किमान तापमान : 28.99° से.
कमाल तापमान : 29.09° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 5.63 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.3°से. - 30.22°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.95°से. - 31.2°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल26.92°से. - 31.17°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.02°से. - 30.17°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.59°से. - 30.1°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.4°से. - 29.75°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादलकेंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय,
नवी दिल्ली, ८ मे – रुग्णालये किंवा आरोग्य सुविधा केंद्रांमध्ये लोकांना भरती करून घेण्यासाठी कोरोनाच्या सकारात्मक अहवालाची मुळीच आवश्यकता नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज शनिवारी घेतला आहे.
या निर्णयाची माहिती देणारे पत्रक मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना जारी केले आहेत. देशभरातील सरकारी आणि खाजगी रुग्णालये, नर्सिग होम्स आणि आरोग्य केंद्रांमध्ये विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना भरती करण्याबाबतच्या राष्ट्रीय धोरणात बदल करण्यात आला आहे. दाखल होण्यासाठी येणारी व्यक्ती कोणत्याही शहरातील किंवा राज्यातील असो, त्या व्यक्तीला कोरोना झाला असेल आणि त्याने चाचणी करून घेतली नसेल, तरी त्यांना देशातील कोणत्याही कोविड केंद्रांत किंवा रुग्णालयांत दाखल करून घेतले जावे आणि प्राणवायूसोबतच इतर अत्यावश्यक औषधेही तातडीने उपलब्ध करून दिली जावीत, असे या आदेशात म्हटले आहे.
आतापर्यंत कोविड रुग्णालयांमध्ये भरती करण्यासाठी कोरोना असल्याचा अहवाल किंवा सीटी स्कॅन अनिवार्य होत. मात्र, केंद्राच्या नव्या निर्णयामुळे कोरोनाच्या संशयित बाधितांना वेळेतच उपचार मिळणे शक्य होणार आहे.
कोरोना झाल्याचा संशय असलेली कुणी व्यक्ती आल्यास त्याला सीसीसी, डीसीएचसी किंवा डीएचसी वॉर्डात दाखल केले जाईल. कोणत्याही रुग्णाला सेवा नकारली जाऊ शकत नाही, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले.
सध्या देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना संशयित रुग्णांचा चाचणी अहवाल येण्यासाठी दोन ते आठ दिवसांचा कालावधी लागत आहे. अशा लोकांकडे अहवाल नसल्याने रुग्णालयात भरती करून घेतले जात नव्हते. त्यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांचे जीव गेले आहेत. केंद्राच्या या निर्णयामुळे अशा लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.