किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 26.46° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.46° से.
23.58°से. - 26.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलडॉ. हर्षवर्धन यांची दिलासादायक माहिती,
नवी दिल्ली, ८ मे – देशात कोरोनाच्या नव्या बाधितांची संख्या दररोज ४ लाखांवर जात असताना एक दिलासादायक बातमी आली आहे, ती म्हणजे देशातील १८० जिल्ह्यांत गेल्या ७ दिवसांत कोरोनाचा एकही नवा बाधित आढळला नाही.
देशातील १८० जिल्ह्यांत गेल्या सात दिवसात कोरोनाचा एकही नवा बाधित आढळला नाही. १८ जिल्ह्यांत १४ दिवसांत कोरोनाचा एकही बाधित सापडला नाही. त्याचप्रमाणे ५४ जिल्ह्यांत २१ दिवसांत नवा बाधित आढळून आला नाही, अशी माहिती मंत्रीसमूहाच्या आज झालेल्या बैठकीत डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. कोरोनाबाधितांची देशातील वाढती संख्या चिंतेचा विषय असला तरी देशाच्या काही भागातून अशा दिलासादायक बातम्या येत असल्याचे डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले. देशाची कोरोना चाचण्यांची रोजची क्षमता २५ लाख असल्याचे ते म्हणाले. देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत १७ कोटी ४९ लाख लसी देण्यात आल्या. वाया गेलेल्या लसी पकडून आतापर्यंत १६ कोटी ६५ लाख ४९ हजार ५८३ लसींचा उपयोग करण्यात आला. ८४ लाख लसी अजून राज्यांजवळ शिल्लक असून, येत्या ३ दिवसांत राज्यांना आणखी ५३ लाख लसींचा पुरवठा केला जाणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.