किमान तापमान : 25.97° से.
कमाल तापमान : 27.32° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 9.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.32° से.
23.58°से. - 27.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी घनघोर बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलप्रारंभिक लक्षणे ओळखून प्राण वाचवणे शक्य,
नवी दिल्ली, ८ मे – कोरोनाच्या दुसर्या लाटेचा संपूर्ण देशाला जबरदस्त तडाखा बसला आहे. या आजाराची प्रारंभिक लक्षणे ओळखून बाधित व्यक्तीचे प्राण वाचविले जाऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोरोनात बहुतांश लोकांना प्रारंभी जास्त ताप जाणवतो. मात्र, अनेक प्रकरणात ताप नसूनही लोक बाधित होत आहेत. अशा स्थितीत अन्य लक्षणे पाहून देखील तुम्ही हा आजार ओळखू शकता.
डोळे किंचित लाल होणे : चीनमध्ये नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार नव्या स्ट्रेनवर लक्ष केंद्रित केल्यानंतर काही खास लक्षणे दिसून आली. इन्फेक्शनच्या नवीन व्हेेरिएंटमध्ये व्यक्तीचे डोळे किंचित लाल अथवा गुलाबी होऊ शकतात. डोळे लालसर होण्याशिवाय सूज आणि डोळ्यात पाणी येण्याच्या तक्रारी देखील असू शकतात.
सततचा खोकला : सततचा खोकला असणे हे देखील कोरोना विषाणूच्या संक्रमणाचे संकेत आहेत. अर्थात् बरेचदा धूम्रपानामुळे अथवा व्हायरल फ्लू मध्ये होणारा खोकला आणि कोरोनामुळे होणारा खोकला ओळखणे कठीण होऊन बसते. त्यामुळे सततचा खोकला असल्यास कोरोना समजून त्यावर उपचार केले पाहिजेत, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.
श्वास घेण्यास त्रास : कोरोनाच्या दुसर्या लाटेत अनेक बाधितांना श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होत आहे. अशा स्थितीत अस्थमाच्या रुग्णांकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आपल्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्यास, त्वरित ऑक्सिमीटरवर रक्तातील प्राणवायू पातळीची तपासणी करा आणि जर ती ९४ पेक्षा कमी असेल, तर डॉक्टरांशी संपर्क करा.
छातीत वेदना : छातीत वेदना होणे हे कोरोनाचे एक घातक लक्षण समजले जाते. अशाप्रकारची लक्षणे असलेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. आपल्याला देखील छातीत वेदना जाणवत असल्यास विलंब न करता तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधा.
चव आणि गंध कमी होणे : चव आणि गंध कमी होणे हे दोन्ही कोरोनाची असामान्य लक्षणे आहेत. ही लक्षणे व्यक्तीला ताप येण्यापूर्वीच दिसून येतात. केवळ ही एकमेव लक्षणे व्यक्तीत दिसू शकतात आणि दीर्घ काळपर्यंत शरीरात राहू शकतात. एवढेच नव्हे, तर बाधित बरा झाल्यावरही दीर्घ काळपर्यंत ही लक्षणे अनुभवास येऊ शकतात.
थकवा : खोकला आणि ताप याशिवाय कोरोनाबाधिताला बहुतांश वेळा थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. अर्थात् अन्य संसर्गामुळे देखील आपल्याला थकवा अथवा अशक्तपणा येऊ शकतो. मात्र, कोरोनामुळे येणारा थकवा सहन करणे अवघड होऊन बसते.
घशात खवखव : कोरोनामुळे घशात होणारी खवखव आणि थंडी-तापामुळे होणारी खवखव यातील फरक ओळखणे बहुतांश लोकांना कठीण होऊन बसते. लक्षात ठेवा, जर आपल्याला ताप अथवा खोकल्यासह घशात खवखव असेल तर ते कोरोनाचेच लक्षण आहे.
हगवण : अनेक कोरोनाबाधितांना हगवण होणे हे लक्षण जाणवते. अनेक बाधितांना मळमळ, उलटी देखील होते.
स्नायू आणि सांधेदुखी : अनेक कोरोनाबाधितांना खासकरून ज्येष्ठांना स्नायू आणि सांधेदुखीची तक्रार असते. जेव्हा विषाणू ऊती आणि कोशिकांवर (टिश्यू आणि सेल्स) हल्ला करतो तेव्हा स्नायू आणि सांधेदुखी सुरू होते, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. मात्र, हे लक्षण गंभीर आजारी असलेल्या व्यक्तींमध्येच आढळून येते.