किमान तापमान : 27.99° से.
कमाल तापमान : 28.14° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 3.25 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.9°से. - 30.75°से.
रविवार, 17 नोव्हेंबर कुछ बादल27.29°से. - 30.38°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.62°से. - 29.87°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.06°से. - 29.89°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल26.05°से. - 29.46°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.8°से. - 29.31°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादलसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी जारी केले निवेदन,
नवी दिल्ली, ७ मे – पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालानंतर लगेचच अनियंत्रित पद्धतीने झालेला राज्यव्यापी हिंसाचार निंदनीय असून, हा हिंसाचार पूर्वनियोजित आहे. समाजविघातक शक्तींनी महिलांसमवेत घृणास्पद क्रूर वर्तणूक केली. निर्दोष लोकांची निर्दयपणे हत्या केली, घरे जाळली. या हिंसाचाराचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनातून म्हटले आहे. हे निवेदन संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी जारी केले आहे.
लोकशाहीत निवडणुकांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. पश्चिम बंगालमध्ये एवढ्यातच निवडणुका झाल्या. तेथील नागरिकांनी मोठ्या संख्येत या निवडणुकीत सहभाग घेतला. निवडणुकीत स्वाभाविकपणे सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोपप्रत्यारोप होतच असतात. कधीकधी भावनातिरेकाने मर्यादांचे उल्लंघन केले जाते. मात्र, सर्व पक्ष आपल्याच देशातील आहेत आणि निवडणूक प्रक्रियेत भाग घेणारे उमेदवार, समर्थक आणि मतदारसुद्धा आपल्याच देशाचे नागरिक आहेत, हे आम्ही सदैव स्मरणात ठेवले पाहिजे, असे रा. स्व. संघाने म्हटले आहे.
पश्चिम बंगालमध्ये समाजविघातक शक्तींनी व्यावसायिक प्रतिष्ठाने, दुकाने लुटली. हिंसाचारामुळे अनुसूचित जाती-अनुसूचित जमातीतील बंधूंसह हजारो लोकांना आपली घरेदारे सोडून स्वत:च्या प्राणांचे रक्षण करण्याकरिता सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याकरिता भाग पडले. कूच-बिहारपासून सुंदरबनपर्यंत सर्वत्र सर्वसामान्य नागरिकांमध्ये भयाचे वातावरण आहे. निवडणूक निकालानंतर अनियंत्रित पद्धतीने सुरू असलेला हिंसाचार भारताच्या सहअस्तित्व आणि सर्वांच्या मतांचा सन्मान करण्याच्या परंपरेबरोबरच भारतीय राज्यघटनेत अंकित लोक आणि लोकशाहीच्या मूळभावनेच्या अगदी विरुद्ध असल्याचे आमचे स्पष्ट मत असल्याचेही रा. स्व. संघाने स्पष्टपणे नमूद केले आहे.
बंगालमधील हिंसाचारानंतर शासन आणि प्रशासनाची भूमिका केवळ मूकदर्शक आहे ही सर्वाधिक दु:खद गोष्ट आहे. दंगलखोरांना कुणाचेही भय अथवा धाक राहिलेला नाही. एवढेच नव्हे तर शासनप्रशासनाने दंगलखोरांना नियंत्रणात आणण्यात कुठलाही पुढाकार घेतलेला नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.
शासन व्यवस्था कोणतीही असो, कुठल्याही पक्षाची असो, कायदा व सुव्यवस्थेद्वारे समाजात शांती आणि सुरक्षेचे वातावरण निर्माण करणे ही शासनाची पहिली जबाबदारी आहे. तसेच गुन्हेगार आणि समाजविरोधी तत्त्वांच्या मनात सरकारचे भीती निर्माण करणे व हिंसाचार घडविणार्यांना शिक्षा देणे ही देखील शासनाची जबाबदारी आहे. राजकीय पक्ष जरी निवडणुका जिंकत असले तरी निर्वाचित सरकारवर संपूर्ण समाजाच्या रक्षणाची जबाबदारी असते.
पीडित लोकांच्या मनात विश्वास निर्माण करा
राज्यात सुरू असलेला हिंसाचार त्वरित आटोक्यात आणून कायद्याचे राज्य स्थापित करणे, दोषी व्यक्तींना त्वरित अटक करून कठोर कारवाई सुनिश्चित करणे, हिंसाचाराने पीडित लोकांच्या मनात विश्वास आणि सुरक्षेची भावना जागवून त्यांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक पावले उचलणे हीच नवनिर्वाचित सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असली पाहिजे, असा आमचा आग्रह असल्याचे रा. स्व. संघाने म्हटले आहे. तसेच बंगालमध्ये शांतीचे वातावरण प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलावी व राज्य सरकार देखील या दिशेने कारवाई करेल हे सुनिश्चित करावे, असे आवाहन आम्ही केंद्र सरकारला करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या संकटाच्या काळात पीडित परिवारांच्या पाठीशी निर्धारपूर्वक उभे राहून विश्वासाचे वातावरण निर्माण करावे, हिंसाचाराचा कठोर शब्दात निषेध करावा व समाजात सद्भाव आणि शांती व बंधुभावाचे वातावरण निर्माण करण्यासाठी आपले महत्त्वपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने समाजातील सर्व प्रबुद्ध नागरिक, तसेच सामाजिक-धार्मिक-राजकीय नेतृत्वाला निवेदनाच्या माध्यमातून केले आहे.