किमान तापमान : 27.9° से.
कमाल तापमान : 27.96° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 63 %
वायू वेग : 3.4 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.96° से.
27.78°से. - 31.24°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल26.76°से. - 31°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.88°से. - 29.76°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.49°से. - 30.23°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.3°से. - 30.25°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.38°से. - 29.76°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादलअंतर वाढल्यास प्रभाव ८१.३ टक्के,
नवी दिल्ली, ७ मे – देशात तिसर्या टप्प्यातील लसीकरण सुरू झाले असून, कोव्हिशिल्ड लसीबाबत सरकार मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. सरकारच्या विशेष तज्ज्ञांचे एक पॅनल ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेकाच्या कोव्हिशिल्ड लसीच्या दोन्ही मात्रांमधील अंतर वाढवण्याचा विचार करत आहे. दोन मात्रांमधील अंतर वाढल्यास लसीचा प्रभाव वाढतो, असे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या अभ्यासातून पुढे आले असल्याने सरकार हा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
पुढील आठवड्यात हा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. कोव्हिशिल्डच्या दोन मात्रा १२ आठवड्यांच्या अंतराने घेतल्यास त्या ८१.३ टक्के प्रभावी ठरतात, असे द लॅन्सेंट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात सांगण्यात आले होते. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, लसींच्या दोन मात्रा सहा आठवड्यांपेक्षा कमी काळात घेतल्यास याचा प्रभाव केवळ ५५.१ टक्केच होतो. त्यामुळे सरकार लसींच्या मात्रांमधील अंतर वाढविण्याचा निर्णय घेणार आहे.
सीरमने लसीच्या दोन मात्रांमधील अंतर याआधीच ४-६ आठवड्यांवरून वाढवून ६-८ आठवडे केले आहे. सरकारने आता अंतराचा कालावधी अधिक केल्यास लसीच्या पुरवठा साखळीवरील दबाव कमी होण्यास मदत होईल. तसेच तिसर्या टप्प्यात लसीचा अधिक प्रभाव दिसून आला आहे.
एकल मात्रा असलेल्या रशियन लसीला मंजुरी कोरोना महामारीला थोपविण्यासाठी जलद लसीकरण हा एकमेव पर्याय देशासमोर आहे. अशातच, भारतात रशियाच्या स्पुतनिक-लाईट लसीच्या वापराला मंजुरी मिळाली आहे. वेगाने लसीकरण करण्यासाठी ही लस भारतासाठी संजीवनी ठरणार आहे. रशियामध्ये स्पुतनिक लसीचा आणखी एक प्रकार विकसित केला आहे. स्पुतनिक-लाईट असे लसीचे नाव असून, ही एकल मात्रा लस आहे. या लसीची एकच मात्रा कोरोनाविरोधात ८० टक्के कार्यक्षम असल्याचे रशियन अधिकार्यांनी सांगितले.