किमान तापमान : 28.55° से.
कमाल तापमान : 29.67° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 2.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.55° से.
27.91°से. - 30.83°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.32°से. - 30.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.51°से. - 29.25°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.09°से. - 29.82°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.89°से. - 29.89°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 29.34°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादलकाही राज्यांत कठोर उपाययोजना,
नई दिल्ली, ७ मे – कोरोनाची दुसरी लाट आल्याने कित्येक राज्यांनी कठोर निर्बंध लादणे सुरू केले आहे. टाळेबंदी जारी करणार्या राज्यांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्र, बिहार आणि ओडिशासह काही राज्यांत अगोदरच कठोर निर्बंध जारी करण्यात आले आहेत. ओडिशासह काही राज्यांनी यापूर्वीच टाळेबंदी जारी केली. आता केरळ आणि राजस्थानने देखील संपूर्ण टाळेबंदीची घोषणा केली आहे.
केरळात बाधितांची संख्या वाढत असल्याने केरळ सरकारने उद्या शनिवारपासून नऊ दिवसांच्या टाळेबंदीची घोषणा केली. ही टाळेबंदी शनिवारी सकाळी सहा वाजतापासून सुरू होऊन ती १६ मेपर्यंत कायम राहणार आहे, अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन् यांनी दिली. या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुनिश्चित केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
राजस्थानात रविवारपासून संपूर्ण टाळेबंदी
राजस्थान सरकारने देखील कठोर टाळेबंदीची घोषणा केली आहे. दुसरी लाट रोखण्यासाठी राज्यात रविवारपासून ते २४ मेपर्यंत टाळेबंदी लावली जाणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच राज्यातील सर्वच बंद ठेवले जाणार आहे. बाधितांची वाढती संख्या पाहता तामिळनाडू सरकारने देखील गुरुवारी सकाळी चार वाजतापासून कठोर निर्बंध जारी केले आहेत. तामिळनाडूत हे निर्बंध २० मे पर्यंत कायम ठेवले जाणार आहेत. आपत्कालीन सेवेतील आघाडीच्या योद्धेच उपनगरी रेल्वेतून प्रवास करू शकतील. उर्वरित नागरिकांना प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कर्मचार्यांच्या ५० टक्के उपस्थितीसह सरकारी कार्यालये सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मेट्रोसह सार्वजनिक वाहने ५० टक्के क्षमतेने धावतील. किराणा आणि भाजीपाल्याच्या व्यतिरिक्त सर्वच दुकाने बंदा राहतील. मात्र, शॉपिंग काम्प्लेक्समधील किराणा, भाजीपाल्याची दुकाने उघडण्यास परवानगी राहणार नाही, असे तामिळनाडू सरकारने स्पष्ट केले आहे.