किमान तापमान : 29.67° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 48 %
वायू वेग : 2.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.78°से. - 30.99°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.32°से. - 30.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.51°से. - 29.25°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.09°से. - 29.82°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.89°से. - 29.89°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 29.34°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादलमुंबई, ७ मे – कोरोनाने जगभरात थैमान घातले असून, जगातल्या विविध शहरातच नव्हे, तर खेड्यापाड्यातही पसरला आहे. आता तर कोरोना विषाणू जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टवरही पोहोचला आहे.
एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी उभारण्यात आलेल्या बेस कॅम्पमध्ये १० ते १५ जण कोरोनाबाधित असल्याचे एका वृत्तवाहिनीचे म्हणणे आहे. एका वृत्तवाहिनीला एव्हरेस्ट बेस कॅम्पमधील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, आणखी काही जणांना कोरोनाची लक्षण दिसत असून, त्यांच्याही चाचण्या करण्यात येणार आहेत. दरम्यान, १० ते १५ जणांची कोरोना चाचणी सकारात्मक आल्याने ९ मे रोजी आयोजित करण्यात आलेली एव्हरेस्ट चढाईची मोहीम रद्द करण्यात आली, असे बेस कॅम्पच्या प्रमुख मिनिग्मा शेर्पांनी सांगितले.
नेपाळ सरकारमधील अधिकृत सूत्रांनी मात्र असे काही झाले नसल्याचे म्हटले आहे. नेपाळ सरकारने एव्हरेस्टवर चढाई करणार्यासाठी बेस कॅम्पवर पोहोचलेल्या सर्वांना कोरोनासंदर्भात काळजी घेण्याची सूचना केली आहे. शिवाय, अशा मोहिमा आयोजित करणार्या ट्रॅॅव्हल कंपन्यांनी गिर्यारोहकांसाठी बेस कॅम्पवरच विलगीकरणाची सोय करावी, असे निर्देशही नेपाळ सरकारने तेथील व्यावसायिकांना दिल्या आहेत.
यापूर्वी पर्यटन विभागाने सर्व ट्रेेकर्स व गिर्यारोहकांना कोरोना विषाणूच्या प्रसाराविरूद्ध सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. ट्रेकिंगमधून परत आल्यानंतर गिर्यारोहकांसाठी स्वत:ला विलगीकरणात ठेवण्याची व्यवस्था करण्याची विनंती सरकारने ट्रॅव्हल एजन्सी व मोहीम संस्थांना केली होती.
तत्पूर्वी एव्हरेस्टच्या बेस कॅम्पमध्ये कोरोनाबाधित झालेला नॉर्वेचा गिर्यारोहक अरलेड नेस याला हेलिकॉप्टरने काठमांडूला नेण्यात आले होते. नेस यांनी शुक्रवारी केलेल्या टि्वटमध्ये म्हटले आहे की, गुरुवारी पुन्हा चाचणी घेण्यात आली व अहवाल नकारात्मक आला.
ऑस्ट्रेलियाच्या एका गिर्यारोहकाने असा इशारा दिला की, हा विषाणू एव्हरेस्टवर चढाई करणार्या शेकडो गिर्यारोहकांपर्यंत पसरू शकतो. त्यामुळे बेस कॅम्पमध्ये मोठ्या प्रमाणावर चाचणी घेण्याची गरज आहे.