किमान तापमान : 31.26° से.
कमाल तापमान : 33.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 33 %
वायू वेग : 1.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
33.99° से.
27.28°से. - 33.99°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल26.7°से. - 30.57°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.81°से. - 29.87°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.37°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल25.19°से. - 29.85°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर कुछ बादल25.22°से. - 29.93°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, ६ मे – लसीकरणाची गती आणखी वाढवण्याची आणि वाढलेली ही कायम राखण्याची आवश्यकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुवारी व्यक्त केली.
कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे देशात उद्भवलेल्या परिस्थितीचा मोदी यांनी आज एका उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला. देशातील विविध राज्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येबाबतची माहिती या वेळी मोदी यांना देण्यात आली. देशाच्या १२ राज्यांतील बाधितांची संख्या प्रत्येकी एक लाखाच्या वर असल्याचे त्यांना सांगण्यात आले. कोरोनाच्या मृत्युसंदर्भातील जिल्हानिहाय माहितीही त्यांना देण्यात आली.
देशातील लसीकरणाची गती वाढवण्याची आणि ती कायम ठेवण्याची गरज व्यक्त करताना टाळेबंदीदरम्यानही लसीकरण मोहिमेतील कर्मचार्यांना अन्य कोणतेही काम न देण्याची सूचना मोदी यांनी केली.
कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्यांनी उभारलेल्या वैद्यकीय व्यवस्थेची माहितीही मोदींना यावेळी देण्यात आली. वैद्यकीय उपचाराच्या पायाभूत सुविधांतील सुधारणांबाबत केंद्राच्या निर्देशांची माहिती तसेच अन्य आवश्यक मदतही राज्यांना देण्याची सूचना मोदी यांनी केली.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या तसेच ती नियंत्रणात आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबतचा आढावाही बैठकीत घेण्यात आला. औषधांच्या देशभरातील उपलब्धतेचा आढावा घेत रेमडेसिवीर तसेच अन्य आवश्यक औषधांचे उत्पादन वाढवण्याबाबत करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती मोदी यांना देण्यात आली. कोरोना लसीचे उत्पादन वाढवण्याबाबतच्या आराखड्यावर यावेळी चर्चा करण्यात आली.
राज्यांना आतापर्यंत १७ कोटी ७० लाख लसी देण्यात आल्या आहेत. कोरोना लसींच्या नासाडीचा राज्यनिहाय आढावाही यावेळी घेण्यात आला. ४५ वर्षांवरील वयोगटातील ३१ टक्के पात्र लोकांना आतापर्यंत किमान कोरोनाचा पहिली लस देण्यात आली असल्याचे या वेळी सांगण्यात आले.