किमान तापमान : 29.42° से.
कमाल तापमान : 31.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 45 %
वायू वेग : 5.41 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.99° से.
27.28°से. - 31.99°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल26.7°से. - 30.57°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.81°से. - 29.87°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.37°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल25.19°से. - 29.85°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर कुछ बादल25.22°से. - 29.93°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाशहवामान खात्याने दिली सुखद माहिती,
नवी दिल्ली, ६ मे – यावर्षी केरळात मान्सूनचे आगमन निर्धारित वेळेत अर्थात् १ जून रोजीच होणार असल्याची सुखद वार्ता भारतीय हवामान खात्याने आज गुरुवारी दिली. हा आमचा प्राथमिक अंदाज आहे. येत्या १५ मे रोजी दुसरा सुधारित अंदाज जाहीर केला जाईल, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.
हवामान खात्याच्या माहितीचा हवाला देत केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव माधवन् राजीवन् म्हणाले की, केरळात मान्सूनचे आगमन १ जून रोजी होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्याआधी १८ ते २० मे या काळात अंदमान बेटांवर मान्सून दाखल होईल. त्यासाठी वातावरणात कशी परिस्थिती तयार होणार आहे, यावर त्याचा पुढील प्रवास अवलंबून राहणार आहे.
हा आमचा प्राथमिक अंदाज आहे. पुढील आठवड्यापर्यंत वातावरणातील बदलांचा आम्ही अभ्यास करणार आहोत आणि त्यावर आधारित दुसरा अंदाज १५ मे रोजी जाहीर करू. त्यानंतर आणखी एक अंदाज ३१ रोजी जाहीर केला जाईल, असे हवामान खात्याने स्पष्ट केले असल्याचे राजीवन् यांनी सांगितले.
यावर्षीचा मान्सून समाधानकारकच राहील. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात देशात ९७ ते १०४ टक्के असा पाऊस पडेल. कोरोनाच्या संकटाचा सामना करीत असलेल्या देशाच्या कृषिप्रधान अर्थव्यवस्थेसाठी ही सरासरी नक्कीच फायद्याची ठरणार आहे.
अल् निनोचा प्रभाव नाही
यावर्षी अल् निनो या घटकाचा मान्सूनच्या वाटचालीवर कुठलाही प्रभाव राहणार नाही. त्यामुळे केरळात आगमन झाल्यानंतर अल्पावधीतच तो श्रीलंकेकडे कूच करेल आणि त्याच काळात देशातही त्याची वाटचाल सुरूच राहणार आहे, असे यात नमूद आहे.
महाराष्ट्रातही समाधानकारक पावसाचा अंदाज
१० जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल आणि १५ ते १८ जून या काळात तो उर्वरित महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात यावर्षी चांगल्या पावसाची शक्यता फार जास्त असून, ओल्या किंवा कोरड्या दुष्काळाची स्थिती उद्भवणार नाही, असेही राजीवन् यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. मागील दोन वर्षे अरबी समुद्रातील वादळामुळे महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन लांबले होते. मात्र, सध्या अशी कोणतीही चिन्ह दिसत नसल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.