किमान तापमान : 28.6° से.
कमाल तापमान : 29.53° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 4.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.53° से.
27.28°से. - 31.05°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.55°से. - 30.67°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.59°से. - 29.65°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.06°से. - 29.94°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल25.13°से. - 30.01°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.19°से. - 29.62°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादलसर्वोच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले, सुनावणी पूर्ण,
नवी दिल्ली, ६ मे – कोरोनाच्या तिसर्या लाटेत जर बालकांना संक्रमण झाले, तर आपण काय करणार? जर परिस्थिती बिघडली, तर आपल्याजवळ कोणती आपात्कालीन योजना तयार आहे, अशी विचारणा आज गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली. कोरोनाच्या तिसर्या लाटेच्या वृत्ताविषयी सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. देशात कोरोनाच्या दुसर्या लाटेचा तडाखा सुरू असतानाच तिसर्या लाटेचा धोका घोंगावत आहे. तिसर्या लाटेत मुलांवर देखील परिणाम होईल, असे अहवालात म्हटले आहे. हे माहीत असूनही आम्ही केवळ काय असायला पाहिजे यावरच अडकून पडलो आहोत, अशा शब्दांत न्यायालयाने केंद्राला फटकारले.
देशात कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेचा कहर सुरूच आहे. बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने देशात प्राणवायूसाठी हाहाकार माजला आहे. या पृष्ठभूमीवर राजधानी दिल्लीतील प्राणवायूच्या तुडवड्याविषयी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
न्या. धनंजय चंद्रचूड प्रमुख असलेल्या न्यायासनाने कोरोनाच्या तिसर्या लाटेविषयी चिंता व्यक्त केली. रुग्णालयांकडे प्राणवायू साठविण्याची क्षमता आहे काय? प्राणवायू पुरवठ्यात कुठे अडचणी येत आहेत? जर पुरेसा साठा असेल तर ताण येणार नाही? जर बाधितांची संख्या यापेक्षा अधिक वाढली, तर आपण काय करणार? अशा एकामागून एक प्रश्नांची सरबत्ती सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला केली.
तिसर्या लाटेला कसे थोपवून धरणार आहोत, असा प्रश्न करीत याची तयारी आतापासूनच करायला हवी. युवकांचे लसीकरण करायला हवे, असे न्यायालयाने म्हटले. मुले संक्रमित झाली, तर परिस्थिती कशी हाताळणार? मुले स्वत: रुग्णालयात जाऊ शकत नाहीत. त्यांचे आईवडील अशावेळी काय करणार, असा सवालही न्यायासनाने विचारला.
ग्रामीण भारतासाठी काय योजना आहेत?
दिल्ली तर ठीक आहे. पण, आमच्या देशाचा प्रमुख भाग ग्रामीण भारत आहे. साधनसामुग्री वितरण प्रणाली ग्रामीण भारतातही आवश्यक आहे. ग्रामीण भारताचे काय? ग्रामीण भारतही संकटाशी झुंजत आहे. त्यामुळे आपण कोरोनाच्या तिसर्या लाटेचा सामना कसा करणार ते सांगा असे प्रश्नही न्यायालयाने केंद्रापुढे उपस्थित केले.