Posted by वृत्तभारती
Tuesday, March 16th, 2021
राज्यसभेत विधेयकाला मंजुरी, नवी दिल्ली, १६ मार्च – विशेष आणि अपवादात्मक स्थिती असलेल्या महिलांकरिता २४ आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याची परवानगी देणार्या विधेयकाला राज्यसभेने आज मंगळवारी मंजुरी दिली. विरोधकांनी मात्र हे विधेयक निवड समितीकडे पाठविण्याची मागणी केली आहे. सध्या २० आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याची परवानगी देणारा कायदा आहे. ही मर्यादा वाढवून २४ आठवडे करण्याची तरतूद असलेले विधेयक सभागृहात सादर केल्यानंतर त्यावर चर्चा झाली. यानंतर विधेयक मंजूर करण्यात आले. बलात्कारपीडित मुलगी किंवा महिला, व्यभिचाराला...
16 Mar 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, March 16th, 2021
सरकारने केले लोकसभेत मान्य, नवी दिल्ली, १५ मार्च – प्रती लिटर पेट्रोलच्या विक्रीमुळे सरकारला ३३ रुपयांची आणि डिझेलच्या विक्रीमुळे ३२ रुपयांची कमाई होत असते, अशी कबुली केंद्र सरकारतर्फे आज सोमवारी लोकसभेत देण्यात आली. ६ मे २०२० नंतर पेट्रोल व डिझेलवर अबकारी शुल्क, उपकर आणि अधिभार लावण्यात आल्याने, त्यावर अनुक्रमे ३३ आणि ३२ रुपये प्रती लिटर कमाई होत आहे. यापूर्वी ही कमाई अनुक्रमे २३ आणि १९ रुपये अशी होती, असे सांगण्यात...
16 Mar 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, March 8th, 2021
नवी दिल्ली, ८ मार्च – लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज आता आपल्या पूर्वनिर्धारित वेळेत होणार आहे. दोन्ही सभागृहांचे कामकाज सकाळी ११ वाजता सुरू होईल आणि सायंकाळी ६ पर्यंत चालेल. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात राज्यसभा आणि लोकसभेचे अधिवेशन वेगवेगळ्या वेळात बोलावले जात होते. राज्यसभेचे कामकाज सकाळी ९ ते दुपारी २, तर लोकसभेचे कामकाज दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत होत होेते. मात्र, या वेळा गैरसोयीच्या असल्याची तक्रार अनेक...
8 Mar 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, March 8th, 2021
नवी दिल्ली, ७ मार्च – चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा उद्या सोमवारपासून सुरू होणार आहे. अधिवेशनाचा हा दुसरा टप्पा महिनाभर चालेल. ८ एप्रिल रोजी संपणार्या या अधिवेशनात केंद्र सरकार विविध विधेयके सादर करणार आहे. यामध्ये पेंशन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (दुरुस्ती) विधेयक, सार्वजनिक बँकांसाठी वित्तीय पायाभूत सुविधा आणि विकास विधेयक, वीज (दुरुस्ती) विधेयक, क्रिप्टो चलन आणि अधिकृत...
8 Mar 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, February 13th, 2021
जम्मू-काश्मीरला योग्य वेळी राज्याचा दर्जा, अमित शाह यांची लोकसभेत जोरदार फटकेबाजी, चार पिढ्यांनी केले नाही, ते १७ महिन्यांत केले, नवी दिल्ली, १३ फेब्रुवारी – आम्हाला १७ महिन्यांच्या काळाचा हिशेब मागण्याऐवजी ७० वर्षांत जम्मू-काश्मीरसाठी तुम्ही काय केले, ते आधी सांगा, या शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज शनिवारी कॉंग्रेसवर हल्ला चढवला. तुमच्या चार पिढ्यांनी जे काम केले नाही, ते आम्ही १७ महिन्यांत केले. जम्मू-काश्मीरच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे,...
13 Feb 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, February 10th, 2021
कृषी कायद्याने मिळाला शेतकर्यांना पर्याय, दिशाभूल करणे थांबवा, आंदोलन अपवित्र करू नका, हा गोंधळच विरोधकांचे मनसुबे सांगतो, पंतप्रधान मोदी यांचा लोकसभेत घणाघात, नवी दिल्ली, १० फेब्रुवारी – नवीन कृषी कायद्यांनी शेतकर्यांना एक पर्यायी व्यवस्था उपलब्ध झाली आहे. या कायद्यांनी शेतकर्यांचे कोणते हक्क आणि अधिकार हिरावले गेले, हे त्यांनी सांगितले पाहिजे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. शेतकर्यांच्या व्यापक कल्याणासाठी जे काही करणे आवश्यक असेल, ते सरकार यापुढेही करेल....
10 Feb 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, February 10th, 2021
गुलाम नबींनी पक्षासोबतच देशाचीही चिंता केली, नवी दिल्ली, ९ फेब्रुवारी – गुलाम नबी आझाद यांनी आपल्या पक्षासोबत देशाचीही चिंता केली, तसेच विरोधी पक्षनेते म्हणून सभागृहात काम करताना आदर्श निर्माण केला, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी काढले. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद राज्यसभेतून निवृत्त होत आहे. त्यांना निरोप देण्याच्या समारंभात मोदी अतिशय भावुक झाले होते. त्यांचा कंठ दाटून आला, डोळ्यांच्या कडाही पाणावल्या. आझाद माझे जवळचे मित्र आहेत, विरोधी...
10 Feb 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, February 10th, 2021
अमित शाह यांचा पलटवार, नवी दिल्ली, ९ फेब्रुवारी – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विश्वभारतीला दिलेल्या भेटीच्या काळात रवींद्रनाथ टागोर यांचा अपमान केला होता, ते त्यांच्या खुर्चीवर बसले होते, असा आरोप करणारे कॉंग्रेसचे नेते अधीररंजन चौधरी यांचा अमित शाह यांनी आज मंगळवारी खरपूस समाचार घेतला. टागोरांच्या खुर्चीवर मी नाही, तर नेहरू बसले होते, अशी चपराक अमित शाह यांनी हाणली. अमित शाह यांच्या बंगालमधील शांतीनिकेतनच्या दौर्यावरून अधीररंजन यांनी सोमवारी सभागृहात बोलताना...
10 Feb 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, February 9th, 2021
किमान हमीभाव होता, आहे, उद्याही कायम राहील, कृषी कायद्यातील त्रुटी व कमजोरी दूर करण्याची तयारी, नवी दिल्ली, ८ फेब्रुवारी – शेतकर्यांनी आंदोलन मागे घेऊन पुन्हा चर्चेसाठी समोर यावे, संसदेच्या माध्यमातून मी तुम्हाला पुन्हा चर्चेसाठी आमंत्रित करतो. आमचे दरवाजे चर्चेसाठी नेहमीच उघडे आहेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी केले. किमान हमीभावाची व्यवस्था कायम होती, आजही आहे आणि पुढेही कायम राहील, असा निर्वाळाही त्यांनी दिला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर...
9 Feb 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, February 9th, 2021
अशा लोकांना ओळखा, सावध राहा: पंतप्रधानांनी काढला विरोधकांचा जोरदार चिमटा, नवी दिल्ली, ८ फेब्रुवारी – श्रमजीवी, बुद्धिजीवी यासोबतच गेल्या काही दिवसांत देशात एक नवीन जमात समोर आली आहे, ती म्हणजे आंदोलनजीवी. या जमातीचे लोक आपल्याला सर्वत्र दिसतील. वकिलांचे आंदोलन असो, विद्यार्थ्याचे आंदोलन असो की, कामगारांचे, या जमातीचे लोक आपल्याला सर्वच ठिकाणी दिसतील. कधी हे लोक पडद्यासमोर असतात, तर कधी पडद्यामागे, असा जोरदार चिमटा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी राज्यसभेत...
9 Feb 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, February 9th, 2021
राजनाथसिंहांच्या आवाहनाला विरोधकांचा प्रतिसाद, नवी दिल्ली, ८ फेब्रुवारी – राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला आज सोमवारी अखेर लोकसभेत प्रारंभ झाला. तत्पूर्वी, शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावरून झालेल्या गोंधळामुळे आज पाचव्या दिवशीही लोकसभेचे कामकाज स्थगित करावे लागले होते. मात्र, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी केलेल्या प्रतिसादाला आवाहनाला विरोधकांनी प्रतिसाद दिल्याने सदनात धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू झाली. आज लोकसभेच्या कामकाजाला प्रारंभ होताच सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. त्याचवेळी विरोधी सदस्यांनी हातात फलक घेत अध्यक्षांच्या...
9 Feb 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, February 6th, 2021
नवी दिल्ली, ५ फेब्रुवारी – कंत्राटी शेतीमुळे तुमची जमीन जाईल, असा अपप्रचार करून शेतकर्यांची दिशाभूल केली जात आहे. मात्र शेतकर्यांची जमीन जाईल, असे कोणत्या कायद्यात लिहिले आहे, असे कोणी सांगायला तयार नसल्याचा घणाघात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आज शुक्रवारी राज्यसभेत केला. कॉन्ट्रॅक्टमधून कोणत्याही क्षणी शेतकरी बाहेर निघू शकेल, अशी तरतूद या कायद्यात आहे, याकडे लक्ष वेधत तोमर म्हणाले की, मात्र व्यापार्याशी केलेल्या अशा करारात आधी पूर्ण...
6 Feb 2021 / No Comment / Read More »