Posted by वृत्तभारती
Saturday, February 6th, 2021
नवी दिल्ली, ५ फेब्रुवारी – कृषी कायद्यावरून झालेल्या गोंधळामुळे आज लागोपाठ चौथ्या दिवशीही लोकसभेचे कामकाज अनेक वेळा स्थगित करावे लागले. गोंधळ शांत होत नसल्यामुळे शेवटी सभापती ओम बिर्ला यांनी कामकाज सोमवारपयर्र्त स्थगित केले. सभागृहाच्या कामकाजाला आज प्रारंभ होताच बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला, त्याचवेळी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी हातात पोस्टर्स घेत सभापतींसमोरील मोकळ्या जागेत धाव घेत घोषणाबाजी सुरू केली. ‘तानाशाही नही चलेंगी’, अशा घोषणा हे सदस्य देत होते. यामुळे सभागृहात प्रचंड...
6 Feb 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, January 30th, 2021
पुढील वर्षी आर्थिक विकासाचा दर ११ टक्के, चालू वर्षात अर्थव्यवस्था उण्यावरच राहणार, नवी दिल्ली, २९ जानेवारी – कोरोना महामारीच्या सावटातून देशाची अर्थव्यवस्था झपाट्याने सावरत असली, तरी चालू आर्थिक वर्षात विकासाचा दर उण्यावरच राहणार आहे. तथापि, पुढील आर्थिक वर्षाच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था ११ टक्के या गतीने विकास करणार आहे. कोरोना संकटाच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्राचा मोठा हातभार लागला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी आज शुक्रवारी लोकसभेत सादर केलेल्या आर्थिक...
30 Jan 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, January 29th, 2021
नवी दिल्ली, २९ जानेवारी – अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा १५ ऐवजी १३ फेब्रुवारीला संपणार आहे, अशी माहिती सूत्रांनी आज शुक्रवारी दिली. मात्र, कामकाजाचे एकूण दिवस तितकेच राहतील, असेही स्पष्ट केले. याबाबत लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीसोबत चर्चा करण्यात आली. पूर्वीच्या निर्धारित कार्यक्रमाप्रमाणे हा पहिला टप्पा १५ फेब्रुवारीपर्यंत होणार होता. मात्र, आता हा पहिला टप्पा १३ फेब्रुवारी रोजी संपणार असून, त्यानंतर ८ मार्चपासून दुसरा टप्पा सुरू होईल. त्यामुळे कामकाजाचे एकूण दिवस तितकेच...
29 Jan 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, January 14th, 2021
नवी दिल्ली, १४ जानेवारी – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला २९ जानेवारीपासून प्रारंभ होत असून १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार असल्याचे लोकसभा सचिवालयाने आज सांगितले. संसदेच्या दोन्ही सभागृहाचे अधिवेशन बोलवण्याबाबतची अधिसूूचना राष्ट्रपतींनी आज जारी केली. २९ जानेवारीला सकाळी ११ वाजता संसदेच्या मध्यवर्ती कक्षात होणार्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे. १ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतील. त्याआधी आर्थिक सर्वेक्षण मांडले जाईल....
14 Jan 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, November 3rd, 2020
नवी दिल्ली, २ नोव्हेंबर – उत्तरप्रदेशातील राज्यसभेच्या १० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने आठ तर सपा आणि बसपा यांना प्रत्येकी एक जागा मिळाली. भाजपाच्या विजयी उमेदवारांत केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री हरदीपसिंग पुरी, भाजपाचे राष्ट्रीय महासचिव अरुणसिंह, माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र नीरजशेखर, माजी पोलिस महासंचालक ब्रिजलाल, बी. एल. शर्मा, हरिद्वार दुबे, गीता शाक्य आणि सीमा द्विवेदी यांचा समावेश आहे. समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव तर बसपाचे रामजित गौतमही वरिष्ठ सभागृहात पोहोचले. राज्यसभेच्या...
3 Nov 2020 / No Comment / Read More »