किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलपुढील वर्षी आर्थिक विकासाचा दर ११ टक्के, चालू वर्षात अर्थव्यवस्था उण्यावरच राहणार,
नवी दिल्ली, २९ जानेवारी – कोरोना महामारीच्या सावटातून देशाची अर्थव्यवस्था झपाट्याने सावरत असली, तरी चालू आर्थिक वर्षात विकासाचा दर उण्यावरच राहणार आहे. तथापि, पुढील आर्थिक वर्षाच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था ११ टक्के या गतीने विकास करणार आहे. कोरोना संकटाच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्राचा मोठा हातभार लागला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी आज शुक्रवारी लोकसभेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.
टाळेबंदीचा टप्पा संपुष्टात आल्यानंतर अर्थचक्र सुरू झाले आणि कोरोना संकटातून अर्थव्यवस्था बाहेर येण्यास सुरुवात झाली. आता बर्यापैकी गती प्राप्त झाली आहे. अर्थव्यवस्थेची ही वाटचाल ‘व्ही’ आकाराची सुरू आहे. मात्र, यावर्षीचा विकास दर उणे ७.७ टक्के इतका राहील, असे यात नमूद आहे.
कोरोना महामारीचा सामना करताना, सरकारने अनेक आघाड्यांवर राबविलेल्या उपायांचे सकारात्मक परिणाम आता दिसून लागले आहेत. चालू आर्थिक वर्षातील उणे दर हा टाळेबंदीचे परिणाम आहे. केवळ भारतालाच नव्हे, तर जागतिक अर्थव्यवस्थेला कोरोनाचा फटका बसला आहे.
कृषी क्षेत्रानेच तारले
कोरोना संकटाच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्राचा मोठा हातभार लागला आहे. सेवा, उत्पादन आणि बांधकाम क्षेत्राला टाळेबंदीचा मोठा फटका बसला, असे या सर्वेक्षणात नमूद आहे. आता आर्थिक विकासाचा मार्ग खुला झाला आहे. यात पुरवठा क्षेत्राची चांगली कामगिरी, शिथिल करण्यात आलेले निर्बंध, पायाभूत क्षेत्रांमधील वाढती गुंतवणूक, उत्पादनावर आधारित प्रोत्साहनपर योजना, सेवा क्षेत्रातील वाढती मागणी, जनतेची वाढलेली क्रयशक्ती या सर्वांमुळे आपली अर्थव्यवस्था मोठ्या संकटातून बाहेर पडली आहे.
सरकारने खर्च वाढवावा
अर्थव्यवस्थेला चांगली गती देण्यासाठी सरकारने आता खर्च वाढवावा, असा सल्ला आर्थिक सर्वेक्षणातून देण्यात आला आहे. यात प्राचीन काळातील राजा-महाराजांच्या काळातील उदाहरण देण्यात आले आहे. दुष्काळाच्या काळात भारतातील राजे-महाराजे नागरिकांना रोजगार द्यायचे आणि खाजगी क्षेत्रांमध्ये सुधारणा आणण्यासाठी महाल, किल्ले बांधायचे. अशाच प्रकारचे उपाय करण्याची आता आवश्यकता आहे. यावर जितका जास्त खर्च होईल, तितक्याच जास्त प्रमाणात लोकांना काम मिळेल आणि याचे सकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसून येतील, असे सर्वेक्षणात म्हटले आहे.
जीव वाचविण्यास प्राधान्य : सुब्रमण्यम्
आर्थिक सर्वेक्षण सादर झाल्यानंतर दुपारी याबाबत पत्रपरिषदेत माहिती देताना मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमण्यम् म्हणाले की, कोरोना संकटाच्या काळात अर्थव्यवस्था आणि नागरिकांचे जीव हे दोन प्राधान्याचे मुद्दे होते. घसरण अटळ होती, पण यातून बाहेर पडण्याचे मार्ग समोर आपल्याला मिळणारच होते. त्यामुळे नागरिकांचे प्राण वाचविण्यास आणि त्यांच्या उपजीविकेला सरकारने प्राधान्य दिले. यामुळेच जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाबाधित आणि मृत्युदर सर्वांत कमी राहिला आहे. कोरोनाविरुद्ध लढाई सुरूच ठेवताना आता सरकारने आर्थिक आघाड्यांवरही ठोस पुढाकार घेतला असून, त्याचे चांगले परिणाम पुढील आर्थिक वर्षात पाहायला मिळणार आहे.
ठळक वैशिष्ट्ये
टाळेबंदीमुळे वाचले एक लाख लोकांचे प्राण
३७ लाख लोकांना संसर्गापासून वाचविले
पहिल्या सहामाहीत निर्यात ५.८ व आयात ११.३ टक्के घसरली
आर्थिक धोरणात रवींद्रनाथ ठाकूर यांचे प्रतिबिंब
सार्वजनिक खर्चात अडीच टक्क्यांची वाढ होणे आवश्यक
कर्जवसुलीची व्यवस्था आणखी मजबूत करणार
व्यावसायिक क्षेत्रात विदेशी गुंतवणूक वाढावी