किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, ५ फेब्रुवारी – कृषी कायद्यावरून झालेल्या गोंधळामुळे आज लागोपाठ चौथ्या दिवशीही लोकसभेचे कामकाज अनेक वेळा स्थगित करावे लागले. गोंधळ शांत होत नसल्यामुळे शेवटी सभापती ओम बिर्ला यांनी कामकाज सोमवारपयर्र्त स्थगित केले.
सभागृहाच्या कामकाजाला आज प्रारंभ होताच बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला, त्याचवेळी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी हातात पोस्टर्स घेत सभापतींसमोरील मोकळ्या जागेत धाव घेत घोषणाबाजी सुरू केली. ‘तानाशाही नही चलेंगी’, अशा घोषणा हे सदस्य देत होते. यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या गोंधळातच आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लसीकरणाबाबतच्या प्रश्नाचे उत्तर दिले.
कोरोनासारख्या गंभीर विषयांवरचे प्रश्न आज आहे. त्यामुळे सदस्यांनी गोंधळ करू नये, आपल्या जागेवर जावे, असे आवाहन बिर्ला करत होते. पण विरोधी सदस्यांनी त्याकडे दुर्लक्ष करुन घोषणाबाजी सुरूच ठेवली. सभागृहातील गोंधळ शांत होत नसल्यामुळे शेवटी त्यांनी कामकाज सायंकाळी ६ वाजेपर्यंत स्थगित केले. सायंकाळी ६ वाजता कामकाज सुरू होताच पुन्हा गोंधळ सुरू झाला. विरोधी सदस्य ऐकण्याच्या स्थितीत नसल्यामुळे त्यांनी सभागृहाचे कामकाज सोमवारपयर्र्त स्थगित केले.