किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, १४ जानेवारी – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला २९ जानेवारीपासून प्रारंभ होत असून १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार असल्याचे लोकसभा सचिवालयाने आज सांगितले. संसदेच्या दोन्ही सभागृहाचे अधिवेशन बोलवण्याबाबतची अधिसूूचना राष्ट्रपतींनी आज जारी केली.
२९ जानेवारीला सकाळी ११ वाजता संसदेच्या मध्यवर्ती कक्षात होणार्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे. १ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतील. त्याआधी आर्थिक सर्वेक्षण मांडले जाईल. यावेळी प्रथमच अर्थसंकल्प छापला जाणार नाही.
अर्थसंकल्पाचा पहिला टप्पा १५ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. विविध मंत्रालयांच्या अनुदानित मागण्यांवर संसदीय स्थायी समित्यांच्या बैठकीत चर्चा करण्यासाठी अधिवेशनाला जवळपास तीन आठवड्यांची सुटी राहणार आहे. अधिवेशनाच्या दुसर्या टप्प्याला ८ मार्चपासून प्रारंभ होणार असून तो ८ एप्रिलपर्यंत चालेल. अधिवेशनादरम्यान कोरोनाविषयक निर्बंधाचे पालन केले जाणार आहे. कोरोनामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन होऊ शकले नव्हते, तर पावसाळी अधिवेशन वेळेआधी गुंडाळावे लागले होते.