किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, २९ जानेवारी – अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा १५ ऐवजी १३ फेब्रुवारीला संपणार आहे, अशी माहिती सूत्रांनी आज शुक्रवारी दिली. मात्र, कामकाजाचे एकूण दिवस तितकेच राहतील, असेही स्पष्ट केले.
याबाबत लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीसोबत चर्चा करण्यात आली. पूर्वीच्या निर्धारित कार्यक्रमाप्रमाणे हा पहिला टप्पा १५ फेब्रुवारीपर्यंत होणार होता. मात्र, आता हा पहिला टप्पा १३ फेब्रुवारी रोजी संपणार असून, त्यानंतर ८ मार्चपासून दुसरा टप्पा सुरू होईल. त्यामुळे कामकाजाचे एकूण दिवस तितकेच राहतील.
पावसाळी अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सदनांचे शनिवारी आणि रविवारी कामकाज झाले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात या दिवशी पूर्वीप्रमाणेच कामकाज होणार नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशाचे सूप ८ एप्रिल रोजी वाजणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपतींनी केलेल्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी १० तासांचा अवधी कामकाज सल्लागार समितीने निर्धारित केला आहे. २, ३ आणि ४ फेब्रुवारी रोजी ही चर्चा होणार असून, ५ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेला उत्तर देतील.