|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:33 ए एम | सूर्यास्त : 5:52 पी एम
हवामान

किमान तापमान : 28.58° से.

कमाल तापमान : 29.99° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 37 %

वायू वेग : 3.2 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

29.99° से.

हवामानाचा अंदाज

25.84°से. - 30.87°से.

शुक्रवार, 15 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.21°से. - 30.97°से.

शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.35°से. - 30.7°से.

रविवार, 17 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.27°से. - 30.86°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.52°से. - 31.46°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.53°से. - 30.46°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
Home »

अहमदनगरच्या नामांतराविरोधात उच्च न्यायालयात याचिका

अहमदनगरच्या नामांतराविरोधात उच्च न्यायालयात याचिकामुंबई, (२० जुन) – महायुती सरकारने अहमदनगर शहराचे नामांतर अहल्यानगर करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौंडी येथील कार्यक्रमातून याबाबतची घोषणा केली होती. मात्र, अहमदनगरचे नामांतर करण्यास विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, राज्य सरकारने या नामांतरास मंजुरी दिली असली, तरी केंद्र सरकारची मान्यता घेणे गरजेचे आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात मुबंई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, अर्शद...20 Jul 2024 / No Comment / Read More »

कलम २१ घटनेचा आत्मा, नागरिकांचे स्वातंत्र्य सर्वोच्च

कलम २१ घटनेचा आत्मा, नागरिकांचे स्वातंत्र्य सर्वोच्च– सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण, नवी दिल्ली, (०३ मार्च) – नागरिकांचे स्वातंत्र्य सर्वांत महत्त्वाचे आहे. कलम २१ हे घटनेचा आत्मा आहे. उच्च न्यायालयांनी त्याच्या संबंधित प्रकरणांचा वेगाने निपटारा न केल्यास एखाद्या व्यक्तीला या मौल्यवान अधिकारापासून वंचित राहावे लागले, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर महाराष्ट्रातील एका नगरसेवकाच्या हत्येतील प्रमुख आरोपी अमोल विठ्ठल वाहिले याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिल्याची नोंद घेत, न्या. भूषण गवई आणि न्या. संदीप मेहता यांनी...3 Mar 2024 / No Comment / Read More »

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीला स्थगिती

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीला स्थगितीनवी दिल्ली, (०८ जानेवारी) – खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे २३ मार्च २०२३ पासून रिक्त असलेल्या पुणे लोकसभा जागेसाठी तातडीने पोटनिवडणूक घेण्यात यावी, या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. विद्यमान लोकसभेचा कालावधी १६ जून रोजी संपुष्टात येणार आहे. अशा स्थितीत पोटनिवडणूक़ घेणे व्यावहारिकदृष्ट्या योग्य होणार नाही आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारही नाही, असा युक्तिवाद निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पार्डीवाला आणि न्या....8 Jan 2024 / No Comment / Read More »

गौतम नवलखाला सर्वोच्च न्यायालयाचा झटका

गौतम नवलखाला सर्वोच्च न्यायालयाचा झटकानवी दिल्ली, (०४ जानेवारी) – कोरेगाव भीमा हिंसाचारातील आरोपी असलेल्या गौतम नवलखाला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलासा देण्यास नकार दिला. त्याच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. यामुळे नजिकच्या भविष्यात नवलखाला जामीन मिळण्याचा मार्ग बंद झाला आहे. न्या. एम. एम. सुंदरेश आणि न्या. एस. व्ही. एन. भट्टी यांच्या तीन सदस्यीय न्यायासनाने या प्रकरणी सुनावणी केली. यावेळी न्यायालयाने या प्रकरणातील इतर आरोपींशी संबंधित एनआयएची याचिका सरन्यायाधीश धनंजय...6 Jan 2024 / No Comment / Read More »

भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य मर्यादेपलीकडे नको

भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य मर्यादेपलीकडे नको– मुंबई उच्च न्यायालयाचे निरीक्षण, मुंबई, (१३ डिसेंबर) – भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला वाजवी मर्यादेपलीकडे जाण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही अन्यथा त्याचे घातक परिणाम होऊ शकतात, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्या. मिलिंद जाधव यांच्या एकल खंडपीठाने हिताची अस्टेमो फी या ऑटो पार्ट्स बनवणार्या कंपनीतील कर्मचार्याची सेवा समाप्ती कायम ठेवताना मंगळवारी हे निरीक्षण नोंदवले. कंपनीच्या विरोधात फेसबुकवर दोन पोस्ट अपलोड केल्यानंतर कर्मचार्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. हिताची कंपनीविरोधात...13 Dec 2023 / No Comment / Read More »

बुलेट ट्रेन प्रकल्पाला काम बंदची नोटीस

बुलेट ट्रेन प्रकल्पाला काम बंदची नोटीस– प्रदूषणाच्या मुद्यावर महापालिकेची कारवाई, मुंबई, (१३ डिसेंबर) – मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी मेट्रो पाठोपाठ बुलेट ट्रेन प्रकल्पालाही काम बंद नोटीस बजावण्यात आली आहे. बीकेसी येथील मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेकडून आखण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी होत नसल्याने ही नोटीस देण्यात आली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी लागू केलेली नियमावली न पाळल्यामुळे नोटीस बजावण्यात आली. मुंबईत प्रदूषण कमी करण्यासाठी प्रशासनाकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आले. मात्र, या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन योग्य...13 Dec 2023 / No Comment / Read More »

वरवरा रावला हैदराबाद जाण्याची परवानगी

वरवरा रावला हैदराबाद जाण्याची परवानगीमुंबई, (३० नोव्हेंबर) – २०१८ मधील एल्गार परिषद प्रकरणी अटक करण्यात आलेल्या वरवरा रावला विशेष न्यायालयाने मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी हैदराबादला जाण्याची परवानगी दिली. डाव्या डोळ्यावरील शस्त्रक्रियेसाठी ५ ते ११ डिसेंबर या कालावधीत हैदराबादला जाण्याची परवानगी न्यायाधीश राजेश कटारिया यांनी दिली. दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घ्यायचा नाही, असा इशारा न्यायालयाने त्याला दिला आहे. एल्गार परिषद प्रकरणात वरवरा रावला मुंबई उच्च न्यायालयाने वैद्यकीय आधारावर अस्थायी जामीन दिला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याच आधारावर त्याला...30 Nov 2023 / No Comment / Read More »

समीर वानखेडे यांना कारवाईपासून दिलेले संरक्षण १० जानेवारीपर्यंत वाढवले

समीर वानखेडे यांना कारवाईपासून दिलेले संरक्षण १० जानेवारीपर्यंत वाढवलेमुंबई, (२८ नोव्हेंबर) – आर्यन खानशी संबंधित प्रकरणात आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांना सीबीआयने खंडणी आणि लाचखोरीच्या आरोपाखाली आरोपी केले होते. आता या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी समीर वानखेडे यांना कोणत्याही दंडात्मक कारवाईपासून दिलेले अंतरिम संरक्षण १० जानेवारीपर्यंत वाढवले आहे. न्यायमूर्ती पीडी नाईक आणि एनआर बोरकर यांच्या खंडपीठाने वानखेडे यांच्या याचिकेवर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) १० आणि ११ जानेवारी २०२४ रोजी दाखल केलेली एफआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका...28 Nov 2023 / No Comment / Read More »

मराठा आंदोलन: छत्रपती संभाजीनगरमध्ये १४४ लागू, इंटरनेट सेवा बंद

मराठा आंदोलन: छत्रपती संभाजीनगरमध्ये १४४ लागू, इंटरनेट सेवा बंदमुंबई, (०१ नोव्हेंबर) – मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अफवा पसरू नयेत यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बहुतांश भागात बुधवारी सायंकाळपासून ४८ तास मोबाइल आणि ब्रॉडबँड इंटरनेट सेवा बंद राहणार आहे. एका अधिकार्याने ही माहिती दिली आहे. बुधवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून शुक्रवारी (३ नोव्हेंबर) सायंकाळी ६ वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात येत आहे. हा आदेश छत्रपती संभाजीनगर शहर वगळता गंगापूर, वैजापूर,...1 Nov 2023 / No Comment / Read More »