|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:00 | सूर्यास्त : 18:46
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 27.51° C

कमाल तापमान : 27.74° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 67 %

वायू वेग : 2.77 Mps

स्थळ : Mumbai, IN

27.74° C

Weather Forecast for
Saturday, 04 May

27.62°C - 30.55°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 05 May

28.01°C - 30.97°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 06 May

28.26°C - 30.45°C

scattered clouds
Weather Forecast for
Tuesday, 07 May

27.82°C - 30.02°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

27.66°C - 29.83°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

27.67°C - 29.81°C

light rain
Home »

पंतप्रधान मोदी १ व २ मार्चला पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर

पंतप्रधान मोदी १ व २ मार्चला पश्चिम बंगालच्या दौऱ्यावरनवी दिल्ली, (२३ फेब्रुवारी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पश्चिम बंगाल दौरा निश्चित झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ते १ आणि २ मार्चला बंगालला भेट देणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान १ आणि २ मार्चला आराम बाग आणि कृष्णनगरला भेट देणार आहेत. हे पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात आहे. पंतप्रधान ६ मार्चला बारासातला जाणार आहेत. पश्चिम बंगालमधील संदेशखली घटनेनंतर पंतप्रधान मोदींच्या बंगाल दौऱ्याबाबत अटकळ बांधली जात होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शंख फुंकणार पण...23 Feb 2024 / No Comment /

२०४७ पर्यंत देशात पुन्हा एकदा सुवर्णयुग : पंतप्रधान मोदी

२०४७ पर्यंत देशात पुन्हा एकदा सुवर्णयुग : पंतप्रधान मोदी– विकसित भारताचे स्वप्न साकारले असेल, – गरीब पुन्हा गरिबीच्या खाईत लोटला जाऊ नये, याला आमची प्राथमिकता, नवी दिल्ली, (०७ फेब्रुवारी) – देशातील गरीब जनतेच्या जीवनात सुधारणा करणे, ते परत गरिबीच्या खाईत लोटले जाणार नाहीत, याला आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यामुळे कुणी कितीही आक्षेप घेतला, तरी देशातील ८० कोटी जनतेला आम्ही मोफत धान्य देऊच, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली. २०४७ पर्यंत विकसित भारताचा संकल्प प्रत्यक्षात आलेला असेल,...7 Feb 2024 / No Comment /

भारतरत्न जाहीर झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणी झाले भावूक

भारतरत्न जाहीर झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणी झाले भावूकनवी दिल्ली, (०३ फेब्रुवारी) – भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणा केली आहे. यानंतर भाजपाच्या सर्व नेत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर फोटो शेअर करून या निर्णयाची माहिती दिली. ’भारतरत्न’ जाहीर झाल्यानंतर योगी आदित्यनाथ, नीतीन गडकरी, मनोहर लाल खट्टर, नितीश कुमार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी हा आनंदाचा क्षण...3 Feb 2024 / No Comment /

पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचा राजीनामा

पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचा राजीनामानवी दिल्ली, (०३ फेब्रुवारी) – पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामागे वैयक्तिक कारणं असल्याचा दाखला देत, त्यांनी आपला निर्णय जाहीर केला. त्यांनी वर्ष २०२१ मध्ये पंजाबचे ३६ वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली होती. त्यांनी आज शनिवारी आपले राजीनामापत्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर केले आहे. आपल्या पत्रात, मी वैयक्तिक कारणांनी आणि अन्य काही जबाबदाऱ्यांमुळे पंजाबच्या राज्यपालपदाचा आणि चंडीगड या केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासकपदाचा राजीनामा देत...3 Feb 2024 / No Comment /

राज्यसभेत सतनामसिंह संधू, नारायणदास गुप्ता, स्वाती मालीवाल यांनी घेतली शपथ

राज्यसभेत सतनामसिंह संधू, नारायणदास गुप्ता, स्वाती मालीवाल यांनी घेतली शपथनवी दिल्ली, (३१ जानेवारी) – बुधवारी राज्यसभेत तीन नवीन सदस्यांनी शपथ घेतली. सतनाम सिंह संधू, नारायण दास गुप्ता आणि स्वाती मालीवाल यांनी बुधवारी राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर अध्यक्ष जगदीप धनखर यांनी नवीन सदस्यांचे स्वागत केले. मात्र, स्वाती मालीवाल यांना पुन्हा शपथ घ्यावी लागली कारण त्यांच्या पहिल्या शपथेचा अध्यक्षांनी विचार केला नाही आणि त्यांनी पुन्हा त्यांचे नाव पुकारले. वास्तविक, त्यांनी शपथेचा भाग नसलेले काही शब्द वापरले होते. चंदिगड...31 Jan 2024 / No Comment /

भारतीय रेल्वे १००% विद्युतीकरणाच्या जवळ

भारतीय रेल्वे १००% विद्युतीकरणाच्या जवळ– राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केला उल्लेख, नवी दिल्ली, (३१ जानेवारी) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज बुधवारी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना भारतीय रेल्वेने गेल्या १० वर्षांत सुरू केलेल्या अनेक उपक्रमांचा उल्लेख केला. नमो भारत, अमृत भारत आणि वंदे भारत यांसारख्या नवीन ट्रेन्सचा संदर्भ देत मुर्मू म्हणाले की, देशात २५ हजार किलोमीटरहून अधिक रेल्वे ट्रॅक टाकण्यात आले आहेत, जे अनेक विकसित देशांतील रेल्वे ट्रॅकच्या एकूण लांबीपेक्षा जास्त आहे. राष्ट्रपती...31 Jan 2024 / No Comment /

आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन– आज सर्वपक्षीय बैठक, नवी दिल्ली, (३० जानेवारी) – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला ३१ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. ९ डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने ३१ जानेवारीला या अधिवेशनाचा प्रारंभ होणार आहे. मुर्मू यांचे अभिभाषण यावेळी संसदेच्या केंद्रीय कक्षात न होता नवीन संसद भवनातील लोकसभेच्या सभागृहात होणार आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने राष्ट्रपती मुर्मू यांचे यावेळी प्रथमच नवीन संसद भवनात आगमन होणार आहे. १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन्...31 Jan 2024 / No Comment /

देशातील ३१ व्यक्तींना जीवन रक्षा पदक श्रृंखला पुरस्कार

देशातील ३१ व्यक्तींना जीवन रक्षा पदक श्रृंखला पुरस्कार– देशातील ३१ व्यक्तींना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची जीवन रक्षा पदक श्रृंखला पुरस्कार २०२३ साठी मान्यता प्रदान, – महाराष्ट्रातील ३ धाडसी महिलांना जीवन रक्षा पदक, नवी दिल्ली, (२६ जानेवारी) – देशातील ३१ व्यक्तींना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जीवन रक्षा पदक श्रृंखला पुरस्कार २०२३ साठी मान्यता प्रदान केली असून, यात महाराष्ट्रातील तीन पराक्रमी महिलांचा समावेश आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली. यात तीन सर्वोत्तम जीवन रक्षा पदक,...26 Jan 2024 / No Comment /

आज युवक व उद्योजक अभिमानाने स्वतःला उत्तर प्रदेशचे म्हणवतात: आदित्यनाथ

आज युवक व उद्योजक अभिमानाने स्वतःला उत्तर प्रदेशचे म्हणवतात: आदित्यनाथलखनौ, (२४ जानेवारी) – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, उत्तर प्रदेश स्थापना दिन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन जमिनीवर अंमलात आणण्यासाठी एक सशक्त माध्यम बनले आहे. ते म्हणाले की २०१८ मध्ये या दिवशी आमच्या सरकारने ’जिल्हा एक उत्पादन योजना’ सुरू केली होती, जी आज उत्तर प्रदेशला एक नवीन ओळख देत आहे. हा कार्यक्रम सुरू केल्याचा परिणाम असा आहे की पूर्वीच्या सरकारच्या काळात उत्तर प्रदेशची निर्यात ८६ हजार कोटी रुपयांची...24 Jan 2024 / No Comment /

देशातील जनतेचाही काँग्रेसवर बहिष्कार

देशातील जनतेचाही काँग्रेसवर बहिष्कार– इतिहास घडवणार्‍या घटना घडल्या, तेव्हातेव्हा त्यावर काँग्रेसने बहिष्कार घातला, नवी दिल्ली, (१२ जानेवारी) – देशात जेव्हाजेव्हा इतिहास घडवणार्‍या घटना घडल्या, तेव्हातेव्हा त्यावर काँग्रेसने बहिष्कार घातला. यामुळेच देशातील जनताही गेल्या काही निवडणुकांपासून काँग्रेसवर बहिष्कार घालत असल्याचा हल्ला भाजपाने चढवला आहे. भाजपा मुख्यालयात आज आयोजित पत्रपरिषदेत भाजपा प्रवक्ता डॉ. सुधांशू त्रिवेदी यांनी अयोध्येत २२ जानेवारीला होत असलेल्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात बहिष्कार घालण्याच्या काँग्रेसी मानसिकतेवर जोरदार हल्ला चढवला. देशात इतिहास घडवणार्‍या घटना...12 Jan 2024 / No Comment /

ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांचे भारतात स्वागत

ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांचे भारतात स्वागत– राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले राष्ट्रपती भवनात स्वागत, नवी दिल्ली, (१६ डिसेंबर) – अरब जगतातील सर्वात जुने स्वतंत्र राज्य असलेल्या ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक हे त्यांच्या पहिल्या राज्य दौर्‍यावर भारतात आले आहेत. आज सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे राष्ट्रपती भवनात जोरदार स्वागत केले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक द्विपक्षीय चर्चेसाठी दिल्लीतील हैदराबाद हाऊसवर पोहोचले. येथे...16 Dec 2023 / No Comment /

इस्रो मातीचे आणि दगडांचे नमुने चंद्रावरून आणणार

इस्रो मातीचे आणि दगडांचे नमुने चंद्रावरून आणणार– इस्रो प्रमुख सोमनाथ यांचे चांद्रयान-४ चे लक्ष्य, नवी दिल्ली, (१५ डिसेंबर) – इस्रो आता मातीचे आणि दगडांचे नमुने चंद्रावरून पृथ्वीवर आणणार आहे. हे मिशन इतके सोपे नसेल, यासाठी अनेक आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे. अजून बरेच काम करायचे बाकी आहे. ‘सॅम्पल रिटर्न’ मोहीम खूपच क्लिष्ट आहे. यात मानवाची भूमिका कमी असेल, अशी माहिती इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी दिली. राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात ‘राष्ट्रपती भवन व्याख्यानमालेत’ ते बोलत होते....15 Dec 2023 / No Comment /