किमान तापमान : 23.32° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादल– विकसित भारताचे स्वप्न साकारले असेल,
– गरीब पुन्हा गरिबीच्या खाईत लोटला जाऊ नये, याला आमची प्राथमिकता,
नवी दिल्ली, (०७ फेब्रुवारी) – देशातील गरीब जनतेच्या जीवनात सुधारणा करणे, ते परत गरिबीच्या खाईत लोटले जाणार नाहीत, याला आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यामुळे कुणी कितीही आक्षेप घेतला, तरी देशातील ८० कोटी जनतेला आम्ही मोफत धान्य देऊच, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली. २०४७ पर्यंत विकसित भारताचा संकल्प प्रत्यक्षात आलेला असेल, देशात पुन्हा एकदा सुवर्णयुग आलेले असेल, असेही मोदी म्हणाले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर राज्यसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना मोदी यांनी काँग्रेसवर घणाघाती हल्ला चढवला. मोदी यांच्या शाब्दिक मार्यामुळे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे सदस्य अस्वस्थ झाले होते. मोदी यांचे भाषण संपल्यानंतर खडगे यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला. देशातील २५ कोटी लोकांना आम्हाला गरिबी रेषेतून बाहेर काढले. ८० कोटी लोकांना मोफत धान्य योजनेचा लाभ देत आहोत. मात्र, यामुळे विरोधकांच्या पोटात दुखू लागले, असे मोदी म्हणाले. तोच आजार उलटू नये म्हणून रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर डॉक्टर रुग्णाला विश्रांतीचा सल्ला देतात. २५ कोटी लोकांना आम्ही गरिबी रेषेच्या वर आणले असले, तरी ते पुन्हा त्याच खाईत लोटले जाऊ नये, अशी आमची भूमिका आहे. म्हणून देशातील ८० कोटी लोकांना आम्ही मोफत धान्य, शेतकर्यांना पंतप्रधान सन्मान निधी देणार आहोत तसेच गरिबांना आयुष्मान योजनेचा लाभ मिळत राहणार आहे. देशातील जनतेला ८० टक्के सवलतीच्या दरात जीवनावश्यक औषधी मिळणार, हे करण्यापासून कोणी आम्हाला रोखू शकत नाही. आपल्या दीड तासाच्या भाषणात मोदींंनी पंडित जवाहरलाल नेहरूंपासून राहुल गांधींपर्यंत सर्वांचाच समाचार घेतला. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या.
नेहरू दलित आणि आरक्षणविरोधी
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या एका पत्राचा संदर्भ देत, काँग्रेस दलित तसेच अनुसूचित जाती-जमातीच्या तसेच आरक्षणाच्या विरोधात असल्याचा आरोप मोदी यांनी केला. मला कोणत्याही प्रकारचे आरक्षण मान्य नाही, त्यातही नोकरीतील आरक्षण, तर मी कधीच मान्य करू शकत नाही, मी आरक्षणाच्या विरोधात आहे. यामुळे देशाचा दर्जा कमी होईल. नोकरीत आरक्षण मिळाल्यास सरकारी कामाचा दर्जा घसरेल, असे म्हटल्याकडे मोदींनी लक्ष वेधले. मी नेहरूंच्या पत्रातील ज्या विधानाचा उल्लेख केला, ते पत्र उपलब्ध आहे, तुम्ही त्याची खातरजमा करू शकता.
खरगेंचा आशीर्वाद माझ्यासाठी महत्त्वाचा
दोन कमांडर नसल्यामुळे मिळालेल्या मोकळेपणाचा, स्वातंत्र्याचा फायदा घेत खरगे यांनी जोरदार भाषण केले. मनोरंजन करणारे सध्या लोकसभेत नसल्यामुळे त्याची कसर खरगे यांनी राज्यसभेत भरून काढली. लोकसभा निवडणुकीत चारशे जागा जिंकण्यासाठी खरगे यांनी आम्हाला आशीर्वाद दिला, त्यांचा आशीर्वाद मी विनम्रपणे स्वीकारतो. तो आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.