किमान तापमान : 22.78° से.
कमाल तापमान : 22.92° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 4.04 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.92° से.
22.59°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (०७ फेब्रुवारी) – आमचा तिसरा कार्यकाळ आता फार दूर नाही, या कार्यकाळातही देशाच्या विकासाची गती आम्ही कमी होऊ देणार नाही, असा ठाम विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्यक्त केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावरील राज्यसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदी बोलत होते. देशात डॉक्टरांची आणि वैद्यकीय महाविद्यालयांची सं‘या वाढेल, गरिबांना पक्की घरे मिळतील, प्रत्येक घरात नळातून पाणी मिळेल. येत्या पाच वर्षांत बुलेट ट्रेनही धावताना दिसेल, असेही मोदी म्हणाले. सत्तेच्या तिसर्या कार्यकाळात आपले सरकार काय करणार याचा आराखडा मोदी यांनी सादर केला. त्याचप्रमाणे आपल्या सरकारच्या गत दहा वर्षांच्या कार्यकाळातील उपलब्धींचाही आढावा घेतला.
स्वातंत्र्यानंतर सत्तेत आलेल्या काँग्रेसने लोकशाहीचा गळा घोटला. रात्रीतून अनेक राज्य सरकारे बरखास्त केली, देशात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. आताही उत्तर भारत, दक्षिण भारत असा वाद निर्माण करीत देशात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरूच आहे. कृषी क्षेत्राला महत्त्व द्यायचे की उद्योग क्षेत्राला याबाबत काँग्रेस नेहमीच गोंधळलेली होती. राष्ट्रीयीकरण की खाजगीकरण या बाबतीत काँग्रेसची भूमिका संभ्रमाची होती. त्याचा देशाच्या विकासाला फटका बसला. आज हीच काँग्रेस आम्हाला काय केले पाहिजे, याबाबत ज्ञान देत आहे, असा घणाघात मोदी यांनी केला. काँग्रेसच्या नेत्यांची ज्याची स्वत:ची कुठे गॅरंटी नाही, पक्षाच्या ध्येय धोरणाची गॅरंटी नाही, ते मोदींच्या गॅरंटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहे. इतकी वर्षे देशात सत्तेवर असलेल्या काँग्रेसला देशातील जनतेने उचलून फेकले. जनता त्यांच्यापासून दूर गेली. विशेषत: २००४ ते २०१४ या कार्यकाळात जनता त्यांच्यावर नाराज झाली. काँग्रेस पक्ष आणि त्याची विचारधारा कालबाह्य झाली. त्यामुळेच देशातील जनतेने तिला नाकारले आहे, असे मोदी म्हणाले.
राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवताना मोदी म्हणाले की, काँग्रेस पक्षाने त्यांना स्टार्ट अप काढून दिले, पण ते स्टार्टर नाही तर नॉन स्टार्टर आहेत ना ते ‘लिफ्ट’ होऊन राहिले, ना ‘लाँच’ होऊन राहिले. काँग्रेस ही सुरुवातीपासून इंग‘जांपासून प्रेरणा घेत राहिली आहे, त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही त्यांनी गुलामीच्या मानसिकतेला प्रोत्साहन दिले, भारतीय दंडविधानात तसेच फौजदारी कायद्यात कोणताच बदल केला नाही. राजपथचे नावही बदलत कर्तव्यपथ असे केले नाही, तो निर्णय मला घ्यावा लागला, असे मोदी यांनी स्पष्ट केले.
तुमचा विरोध आदिवासी समाजाला
सॅम पित्रोदा यांचे नाव न घेता त्यांच्यावर हल्ला चढवताना मोदी म्हणाले की, ‘हो गया तो गया’ विधानासाठी ते देशभर प्रसिद्ध झाले. काँग्रेसच्या नेतृत्वाच्या अतिशय जवळ असलेल्या या नेत्याने नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान कमी लेखण्याचा प्रयत्न केला. रालोआने राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत आदिवासी कन्या असलेल्या द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देताच तुम्ही त्याला विरोध केला. तुमचा वैचारिक विरोध असता तरी आम्ही समजून घेतले असते, पण आमच्या पक्षातून गेलेल्याला तुम्ही उमेदवारी दिली, हा तुमच्या आक्षेपाचा मुद्दा होता. तुमचा विरोध हा आदिवासी समुदायाला होता. त्यामुळेच तुम्ही राष्ट्रपती झाल्यानंतरही मुर्मू यांचा एवढा अपमान केला की लाजेने मान खाली घालावी लागली.