किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– देशातील ३१ व्यक्तींना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची जीवन रक्षा पदक श्रृंखला पुरस्कार २०२३ साठी मान्यता प्रदान,
– महाराष्ट्रातील ३ धाडसी महिलांना जीवन रक्षा पदक,
नवी दिल्ली, (२६ जानेवारी) – देशातील ३१ व्यक्तींना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जीवन रक्षा पदक श्रृंखला पुरस्कार २०२३ साठी मान्यता प्रदान केली असून, यात महाराष्ट्रातील तीन पराक्रमी महिलांचा समावेश आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली. यात तीन सर्वोत्तम जीवन रक्षा पदक, सात उत्तम जीवन रक्षा पदक आणि २१ पराक‘मी व्यक्तींना जीवन रक्षा पदक असा समावेश आहे. यात तीन पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात येतील.
जीवन रक्षा पदकासाठी राज्यातून आदिका पाटील, प्रियांका काळे व सोनाली बालोडे या तीन महिलांची निवड झाली आहे. एखाद्या व्यक्तीचा जीव वाचविण्याच्या मानवतावादी कृतीसाठी जीवन रक्षा पदक श्रृंखला पुरस्कार प्रदान केले जातात. सर्वोत्तम जीवन रक्षा पदक, उत्तम जीवन रक्षा पदक आणि जीवन रक्षा पदक या तीन श्रेणींमध्ये हा पुरस्कार दिला जातो. सर्व क्षेत्रातील व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र आहेत. हे पुरस्कार मरणोत्तरदेखील दिले जातात.