किमान तापमान : 22.98° से.
कमाल तापमान : 24.96° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 66 %
वायू वेग : 3.61 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.98° से.
21.99°से. - 28.17°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल24.25°से. - 28.57°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.42°से. - 28.53°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.45°से. - 28.31°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल23.73°से. - 28.08°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल23.39°से. - 28.07°से.
रविवार, 01 डिसेंबर छितरे हुए बादल-राष्ट्रपतींचे देशाला संबोधन,
– राम मंदिर, कर्पुरी ठाकूर यांचा उल्लेख,
नवी दिल्ली, (२५ जानेवारी) – ७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. आपल्या प्रजासत्ताकचे ७५ वे वर्ष अनेक अर्थांनी देशाच्या वाटचालीतील ऐतिहासिक मैलाचा दगड आहे. आपला देश स्वातंत्र्याच्या शतकाकडे वाटचाल करीत आहे आणि अमृत कालच्या सुरुवातीच्या कालखंडात जात आहे. हा कालखंडातील परिवर्तनाचा काळ आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी श्रीराम मंदिराचा उल्लेख केला आणि कपुरी ठाकूर यांनाही श्रद्धांजली वाहिली. यावेळी राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, प्रजासत्ताक दिन हा आपली मूलभूत मूल्ये आणि तत्त्वे लक्षात ठेवण्याचा एक महत्त्वाचा प्रसंग आहे. सह-अस्तित्वाची भावना भूगोलाद्वारे लादलेली नाही. १४० कोटींहून अधिक भारतीय एक कुटुंब म्हणून राहतात, आपल्या प्रजासत्ताकाच्या मूळ भावनेने एकत्र राहतात. जगातील या सर्वांत मोठ्या कुटुंबासाठी, सहअस्तित्वाची भावना भूगोलाने लादलेले नाही, तर सामूहिक आनंदाचा नैसर्गिक स्रोत आहे, जो आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवातून व्यक्त होतो.
भाषणात श्रीराम मंदिराचा उल्लेख
राष्ट्रपती म्हणाल्या की, अयोध्येतील भगवान श्रीराम जन्मस्थानी उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात स्थापन झालेल्या मूर्तीच्या अभिषेकाचा ऐतिहासिक सोहळा आपण सर्वांनी पाहिला आहे. भविष्यात या घटनेला व्यापक परिप्रेक्ष्यातून पाहिले जाईल, तेव्हा इतिहासकारांना भारताची आठवण होईल.
यावेळी राष्ट्रपतींनी त्यांच्या अभिभाषणात बिहारचे माजी मुख्यमंत्री भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांचाही उल्लेख केला. त्या म्हणाल्या की, सामाजिक न्यायासाठी अविरत लढा देणार्या कर्पुरी ठाकूरजींची जन्मशताब्दी पूर्ण झाली. कर्पुरीजी हे मागासवर्गीयांचे एक महान वकील होते, ज्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य त्यांच्या कल्याणासाठी समर्पित केले. त्यांचे जीवन एक संदेश होते. कर्पुरीजींना त्यांच्या योगदानाने सार्वजनिक जीवन समृद्ध केल्याबद्दल मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.
द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, दीर्घ आणि कठीण संघर्षानंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश ब्रिटिश राजवटीपासून मुक्त झाला, पण त्या काळीही देशात सुशासनासाठी आणि देशवासीयांच्या अंगभूत क्षमता आणि कलागुणांना मुक्तपणे वाव देण्यासाठी योग्य मूलभूत तत्त्वे आणि प्रक्रिया तयार करण्याचे काम सुरू होते. संविधान सभेने सुशासनाच्या सर्व पैलूंवर सुमारे तीन वर्षे तपशीलवार चर्चा केली आणि आपल्या राष्ट्राचा, भारताच्या संविधानाचा महान पायाभूत मजकूर तयार केला. या आपण सर्व देशवासी त्या दूरदर्शी सार्वजनिक नेत्यांचे आणि अधिकार्यांचे कृतज्ञतेने स्मरण करतो, ज्यांनी आपल्या भव्य आणि प्रेरणादायी संविधानाच्या निर्मितीत अमूल्य योगदान दिले.
निवडणुकीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हे लोकशाहीसाठी उदाहरण
दरम्यान, ‘निवडणूक प्रक्रियेत निवडणूक आयोगाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे हे जगातील सर्व लोकशाहीसाठी एक उदाहरण आहे. भविष्यात त्याचा वापर वाढविला जाईल’, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.
१४ व्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक‘मात त्या बोलत होत्या. महिला, अपंग व्यक्ती व असुरक्षित गटांचा सहभाग वाढवून सर्वसमावेशक निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगाने केलेल्या प्रयत्नांचीही त्यांनी यावेळी प्रशंसा केली.
भारत प्रजासत्ताक होण्याच्या एक दिवस आधी २६ जानेवारी १९५० रोजी निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. गत १४ वर्षांपासून निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून पाळला जातो. गत ७५ वर्षांत निवडणूक आयोगाने १७ लोकसभा निवडणुका आणि ४०० हून अधिक विधानसभा निवडणुकांचे आयोजन केले आहे, असे मुर्मू यांनी नमूद केले.
लोकसभेची निवडणूक प्रकि‘या ही जगातील सर्वांत मोठी निवडणूक प्रकि‘या असून, लोकांनी १२ लाखांहून अधिक मतदान केंद्रावर मतदान केले व १.५ कोटी मतदान कर्मचार्यांनी निवडणूक प्रकि‘येचे व्यवस्थापन केले. एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी निवडणूक आयोगाने केलेल्या प्रयत्नांचाही राष्ट्रपती मुर्मू यांनी उल्लेख केला.
या प्रसंगी मु‘य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना ‘सार्वत्रिक निवडणुकांसाठी भारतीय निवडणूक आयोगाचा पुढाकार’ या उपक‘म प्रकाशनाची पहिली प्रत सादर केली. यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते एका डाक तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. चित्रपट निर्माते राज कुमार हिरानी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय निवडणूक आयोगाद्वारे निर्मित ‘माय व्होट माय ड्युटी’ हा छोटा मतदार जागृतीपर चित्रपटही दाखवण्यात आला. या संदेशांमध्ये लोकशाहीची भावना व एका मताच्या शक्तीचा संदेश देण्यात आला आहे.
निवडणुकीत महिलांना मतदान करण्याची हक्क मिळवून देण्याचे श्रेय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जाते, असे कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले. डॉ. आंबेडकरांनी १९२८ मध्ये महिलांच्या मतदानाच्या अधिकाराचा मुद्दा मांडला होता, असे ते म्हणाले.