किमान तापमान : 24.05° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 6.18 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलगुवाहाटी, (२५ जानेवारी) – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा देशातील सर्वांत भ्रष्ट मुख्यमंत्री असल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज येथे केली. मणिपुरातून ११ जानेवारीला भारत जोडो न्याय यात्रा सुरू झाल्यानंतर आज अकराव्या दिवशी आसाममधील बरपेटा येथील सभेत राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्यावर टीका केली. आसामचे मुख्यमंत्री २४ तास द्वेष आणि भीतीचे वातावरण पसरविण्याचे काम करत आहे. ते राज्यातील जमिनीचीही चोरी करतात. कुणी पान खाल्ल्यास सुपारीचा धंदा त्यांच्या मालकीचा असतो. दररोज पहाटेपासून त्यांचे द्वेष पसरविण्याचे काम सुरू होते. ते सर्वसामान्यांच्या खिश्यातून पैसे काढण्याचे काम करत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.
दरम्यान, मणिपुरात सुरुवात झालेली भारत जोडो न्याय यात्रा आसाममध्ये दाखल होताच सरमा सरकारने काँग्रेसच्या कोंडीचे प्रयत्न सुरू केले होते. त्याला प्रत्युत्तर देत राहुल गांधींनीही सरकारला भ्रष्टाचारी संबोधले. सध्या दोन्ही बाजूंनी आरोप आणि टीकांच्या जोरदार फैरी सुरू आहेत. अशातच सरकारकडून काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल, कन्हैया कुमार यांच्यासह इतरांविरुद्ध हिंसाचार भडकावणे, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केल्याबाबत पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली. दुसरीकडे मंगळवारी काँग्रेस समर्थक आणि पोलिसांत चांगलीच वादावादी झाली होती. शहरात वाहतुकीच्या संभाव्य खोळंब्यावरून पोलिस प्रशासनाने राजधानी गुवाहाटीत प्रवेश नाकारला होता.