किमान तापमान : 30.95° से.
कमाल तापमान : 32.31° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 42 %
वायू वेग : 1.62 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
32.31° से.
25.84°से. - 32.99°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 30.86°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.34°से. - 30.77°से.
रविवार, 17 नोव्हेंबर साफ आकाश27.21°से. - 30.89°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.01°से. - 31.17°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.27°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश– तृणमूलचे नेते डेरेक ओब्रायन यांचा आरोप,
कोलकाता, (२५ जानेवारी) – पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये आघाडी न होण्यास काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी हेच सर्वस्वी जबाबदार असल्याचा आरोप तृणमूलचे नेते डेरेक ओब्रायन यांनी केला आहे.
ममता बॅनर्जी यांनी बुधवारी आपला पक्ष राज्यात लोकसभा निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा केली होती. यानंतर खासदार ब्रायन यांनी उपरोक्त आरोप केला. इंडि आघाडीचे अनेक टीकाकार आहेत. यात भाजपा आणि अधीररंजन चौधरी प्रमुख आहेत, असे ते म्हणाले.
दुसरीकडे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी जागा वाटपाबाबत भाष्य केले. लोकसभेच्या जागा वाटपाबाबत ममता बॅनर्जी यांच्याकडून निश्चितच सकारात्मक भूमिकेची अपेक्षा आहे. तृणमूलशिवाय इंडि आघाडीचे वर्तुळ पूर्ण होऊ शकत नाही. कारण, देशभरात भाजपाविरोधात लढा गरजेचा आहे. ममता बॅनर्जी नक्कीच भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होतील. आम्हाला बंगाल आणि देशात भाजपाला पराभूत करायचे आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्या मनात ममता बॅनर्जींप्रती सन्मान आहे, असेही जयराम रमेश म्हणाले.