किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 50 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.71°से. - 24.88°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपाचे शीर्षक गीत,
नवी दिल्ली, (२५ जानेवारी) – लोकसभा निवडणुकीतील प्रचारासाठी भाजपाने आज ‘सपने नही हकीकत बुनते है, तभी तो सब मोदी को चुनते है’ हे गीत जारी केले.
राष्ट्रीय मतदारदिनानिमित्त उत्तरप्रदेशच्या बुलंदशहर येथे आयोजित युवा तसेच नवमतदारांच्या विशाल मेळाव्यातून भाजपाने आज लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा औपचारिक शुभारंभ केला. या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपाने या आकर्षक गीताचा व्हिडीओ जारी केला. या गीतातून मोदी सरकारने गेल्या साडेनऊ वर्षांत केलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यात आला आहे.
उज्ज्वला योजना, डीबीटी योजना, हर घर नल से जल, पंतप्रधान आवास योजना यासह मोदी सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा आढावा घेण्यात आला आहे. याशिवाय मोदी सरकाच्या परराष्ट्र, संरक्षण धोरणाचाही उल्लेख करण्यात आला आहे. या गीतात रामललाची प्राणप्रतिष्ठा तसेच यशस्वी चंद्रयान मोहिमेचाही तपशील आहे. मोदी देशाला स्वप्न दाखवणारे नेते नाही तर, लोकांच्या स्वप्नांची आणि आशाआकांक्षाची पूर्तता करणारे नेते असल्याचे या गीतातून दाखवण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपाने मोदी की गॅरंटी नावाने अभियान सुरू केले आहे. या अभियानाला हे गीत पूरक ठरणार असल्याचा भाजपाचा विश्वास आहे. याआधी डिसेंबर २०२३ मध्ये भाजपाने लोकसभा निवडणुकीतील प्रचारासाठी ‘आयेगा तो मोदीही’ म्हणून एक गीत जारी केले होते.