किमान तापमान : 23.32° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादल– मोह-माया सोडून जैन धर्माची सन्यस्थ दीक्षा,
नवी दिल्ली, (२५ जानेवारी) – आयआयटी उत्तीर्ण आणि अमेरिकेत केमिकल इंजिनीयर म्हणून काम केलेल्या संकेत पारेख या विद्यार्थ्याने सन्यास घेण्यासाठी उच्च पगाराची नोकरी सोडली. त्याच्या या निर्णयाने त्याची आई मात्र आश्चर्यचकित झाली आहे. भारतभरातील लाखो विद्यार्थी अनेकदा त्यांची १२ वीची परीक्षा पूर्ण केल्यानंतर अभियंता होण्याचे स्वप्न पाहतात आणि यातील बहुतांश विद्यार्थी आयआयटी जेईई परीक्षा उत्तीर्ण करून आयआयटीमध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न पाहतात. आयआयटी हे भारतातील सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी एक मानले जाते, ज्यामध्ये आयआयटी जेईई ही सर्वात कठीण प्रवेश परीक्षांपैकी एक आहे.
आयआयटी उत्तीर्ण असलेल्या २९ वर्षीय संकेत पारेखने ‘दीक्षा’ मिळवण्यासाठी आपली गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतल्याने त्याची आई थक्क झाली होती. संकेत पारेखची जैन धर्माशी ओळख त्याच्या भाविक शाह नावाच्या आयआयटी बॉम्बेतील वरिष्ठाने करून दिली. २०१३ मध्ये त्यांनी ‘दीक्षा’ घेतली होती. ऑनलाईन चॅट करत असताना, त्याच्या संभाषणाला तात्त्विक वळण मिळाले आणि संकेत पारेख आत्मा, मन आणि शरीर या संकल्पनेकडे आकर्षित झाला. संकेत पारेखने आपली आलिशान जीवनशैली सोडून जैन धर्माबद्दल वाचन सुरू केले. त्यानंतर त्याने अडीच वर्षे आचार्य युगभूषणसुरजींच्या हाताखाली विधी आणि इतर मूलभूत गोष्टी शिकण्यासाठी घालवली.