किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– संसदेत प्रतिनिधित्व देण्याची प्रमुख मागणी,
नवी दिल्ली, (२५ जानेवारी) – सध्या केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळख असलेल्या लडाखला राज्याचा दर्जा देण्याचा मुद्दा समोर आला आहे. लडाख क्षेत्रातील प्रतिनिधींनी केंद्रीय गृह मंत्रालयाला या संदर्भात निवेदन सादर केले आहे. दरम्यान, ५ ऑगस्ट २०१९ रोजी लडाखला केंद्रशासित प्रदेश घोषित केले होते. सूत्रांनुसार, लेह अपेक्स बॉडी आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सच्या प्रतिनिधींनी लडाख क्षेत्राला राज्य म्हणून दर्जा देण्यासंदर्भात मागील आठवड्यात एक विस्तृत निवेदन गृह मंत्रालयाला सादर केले होते. यात जम्मू आणि काश्मीर पुनर्गठन विधेयक २०१९ मध्ये संशोधनाचा मसुदाही समाविष्ट आहे.
राज्याचा हा दर्जा सहाव्या अनुसूची अंतर्गत असावा, जेणेकरून नव्या प्रदेशाला सुरक्षिततेसोबत स्थानिकांना रोजगारांच्या संधी मुख्यत्वे प्राप्त होईल. या क्षेत्रात बाल्टी, बेडा, बोट, बोटो, ब्रोकपा, द्रोकपा, दार्ड, शिन, चांगपा, गारा, मोन, पुरिगपा या आदिवसी समुदायाची संख्या अधिक आहे. विशेष असे की, यासंदर्भात केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या अध्यक्षेखालील उच्चस्तरीय समितीकडून लडाखच्या दोन्ही क्षेत्रातील (लेह आणि कारगिल) प्रतिनिधींसोबत बैठका पार पडल्या आहेत. ४ डिसेंबर २०२३ रोजीच्या बैठकीत समितीने प्रतिनिधींच्या मागण्यांबाबत सविस्तर माहिती मागितली होती. दुसरीकडे समितीची पुढील बैठक फे बु्रवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
काही मागण्या
– लडाख लोकसेवा आयोग स्थापन व्हावा
– राज्यसभेत एक जागा मिळावी
– ३७१ कलमान्वये संरक्षण अपेक्षित
-पूर्वेकडील राज्यांच्या धर्तीवर राज्य म्हणून दर्जा मिळावा