किमान तापमान : 28.71° से.
कमाल तापमान : 28.9° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 37 %
वायू वेग : 1.6 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.9° से.
23.85°से. - 28.99°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.07°से. - 29°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादल24.75°से. - 28.05°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.96°से. - 28.55°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.94°से. - 28.56°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.79°से. - 29.28°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादलनवी दिल्ली, (०३ फेब्रुवारी) – भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणा केली आहे. यानंतर भाजपाच्या सर्व नेत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर फोटो शेअर करून या निर्णयाची माहिती दिली. ’भारतरत्न’ जाहीर झाल्यानंतर योगी आदित्यनाथ, नीतीन गडकरी, मनोहर लाल खट्टर, नितीश कुमार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी हा आनंदाचा क्षण असल्याचे म्हटले आहे. हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे लालकृष्ण अडवाणी यांनी सांगितले.
भारतरत्न जाहीर झाल्यानंतर ९६ वर्षीय लालकृष्ण अडवाणी म्हणाले की, मी अत्यंत नम्रतेने आणि कृतज्ञतेने हा सन्मान स्वीकारत आहे. ते म्हणाले की हा केवळ एक व्यक्ती म्हणून माझ्यासाठी सन्मान नाही, तर मी आयुष्यभर माझ्या क्षमतेनुसार सेवा केलेल्या आदर्श आणि तत्त्वांचाही सन्मान आहे. ’हे जीवन माझे नाही, ते माझ्या राष्ट्रासाठी आहे’ या बोधवाक्याने मला प्रेरणा दिल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की आज मला कृतज्ञतेने दोन व्यक्ती पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि अटलबिहारी वाजपेयी आठवतात ज्यांच्यासोबत मी काम केले आहे. या सन्मानाबद्दल त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदी यांचेही आभार मानले आहेत.
सर्वोच्च नागरी पुरस्कारासाठी नावाची घोषणा झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांनी लोक आणि प्रसारमाध्यमांचेही आभार मानले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी प्रतिभा अडवाणीही दिसली. लालकृष्ण अडवाणी यांची कन्या प्रतिभा हिने त्यांना ओवाळून, मिठाई खाऊ घालून त्यांचे तोंड गोड केले आणि मिठी मारून त्यांचे अभिनंदन केले. लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म पाकिस्तानातील कराची येथे ८ नोव्हेंबर १९२७ रोजी एका हिंदू सिंधी कुटुंबात झाला. अडवाणी यांचे प्रारंभिक शिक्षण सेंट पॅट्रिक हायस्कूल, कराची येथून झाले. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर अडवाणींचे कुटुंब पाकिस्तान सोडून मुंबई, भारतात स्थायिक झाले. अडवाणी हे फाळणीपूर्वीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते आणि भारतात आल्यानंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक बनले. राजस्थानमध्ये त्यांनी आरएसएससोबत काम केले. १९५७ मध्ये अडवाणी जनसंघाचे काम करण्यासाठी दिल्लीत आले. अडवाणी दिल्लीत अटलबिहारी वाजपेयी यांच्या घरी राहिले.