किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 44 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– भाजपाने उठवली टीकेची झोड,
नवी दिल्ली, (०३ फेब्रुवारी) – येथील रामलीला मैदानावर आयोजित न्याय संकल्प रॅलीला शनिवारी संबोधित करताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची जीभ घसरली. त्यांनी आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांची तुलना कुत्र्यासोबत केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपाने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
काँग्रेसच्या न्याय संकल्प रॅलीत काँग्रेसच्या बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांपासून वरिष्ठ नेत्यांचा समावेश होता. मल्लिकार्जुन खरगे यांनी रॅलीला संबोधित करताना केंद्र सरकारवर हल्ला केला. मोदींनी सर्वांचाच सत्यानाश केला. या टीकेनंतर त्यांनी पातळी सोडली. कुत्रे विकत घेताना तो व्यवस्थितपणे भुंकतो की नाही, हे आपण तपासून घेतो. त्याचप्रमाणे भुंकणार्या कार्यकर्त्यांना बूथचे काम सोपवले पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
राहुल गांधी देशाचे संविधान वाचवण्यासाठी भाजपा सरकारकडून होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात लढत आहेत. या लढाईत तुमचा पराभव झाला, तर नेहमीसाठी तुम्ही मोदींचे गुलाम व्हाल. पंतप्रधान मोदी यांनी देशातील नागरिकांना गुलामगिरीत टाकले. आज देशात नोकर्यांच्या 30 लाख जागा रिकाम्या आहेत. या जागांवर एससी, एसटी लोक येतील, या भीतीमुळे पदभरती केली जात नाही, असा आरोप खडगे यांनी केला.
बिहारमध्येही असेच झाल्याचे खडगे यांनी नितीशकुमार यांच्यावर टीका करताना सांगितले. पूर्वी दोघेही परस्परांना शिव्या द्यायचे. नितीशकुमार समाजवादी गप्पा करायचे. मात्र, आता त्यांनी पलटी मारली आहे. ते आता पलटूरामपासून पलटूकुमार झाले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा पलटी मारली. नरेंद्र मोदींनाही हीच सवय आहे. ते बोलत नाहीत, पण आतमधून घात करतात. त्यांच्या तोंडात राम आणि बगलेत सुरी आहे, असे खडगे यांनी म्हटले.
लाजीरवाणे वक्तव्य : अमित मालवीय
मल्लिकार्जुन खरगे यांचे वक्तव्य लाजीरवाणे असल्याची टीका भाजपाच्या आयटी सेलचे प्रभारी अमित मालवीय यांनी केली. ज्या पक्षाचे अध्यक्ष सर्वांत महत्त्वपूर्ण आणि मजबूत भाग असलेल्या बूथ एजंटला कुत्रा बनवून चाचणी घ्यायचे वक्तव्य करतात, त्या पक्षाची अधोगती निश्चित आहे, अशी टीका त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये केली.