किमान तापमान : 30.02° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 45 %
वायू वेग : 2.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
26.96°से. - 30.45°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– इस्रो प्रमुख सोमनाथ यांचे चांद्रयान-४ चे लक्ष्य,
नवी दिल्ली, (१५ डिसेंबर) – इस्रो आता मातीचे आणि दगडांचे नमुने चंद्रावरून पृथ्वीवर आणणार आहे. हे मिशन इतके सोपे नसेल, यासाठी अनेक आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे. अजून बरेच काम करायचे बाकी आहे. ‘सॅम्पल रिटर्न’ मोहीम खूपच क्लिष्ट आहे. यात मानवाची भूमिका कमी असेल, अशी माहिती इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी दिली.
राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात ‘राष्ट्रपती भवन व्याख्यानमालेत’ ते बोलत होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आश्वासन देताना ते म्हणाले, मी तुम्हाला खात्री देतो की, आम्ही चंद्रावरून दगड नक्कीच आणू. हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी किमान चार वर्षे लागतील. चांद्रयान-४ मिशनमध्ये काय होणार आहे, ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत. मात्र, सोमनाथ यांनी आपल्या व्याख्यानात हे मिशन आपण जपानसोबत करीत आहोत की नाही, हे सांगितले नाही. कदाचित इस्रो स्वतःहून हे करू शकेल.
चांद्रयान-४ मिशनचे पूर्ण नाव ल्युपेक्स आहे. या प्रकल्पात जपान भारतासोबत काम करीत आहे. ल्युपेक्स म्हणजेच चंद्र ध्रुवीय शोधमोहीम. ल्युपेक्स हे खरे तर आंतरराष्ट्रीय मिशन आहे. जे प्रामुख्याने इस्रो आणि जपानी स्पेस एजन्सी जाक्साद्वारे संयुक्तपणे केले जात आहे. जाक्सा चंद्रावर चालण्यासाठी रोव्हर बनवणार तर इस्रो लॅण्डर बनवणार आहे. नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी यात वापरण्यात येणारी निरीक्षण यंत्रे बनवणार आहेत. ही उपकरणे रोव्हरवर बसवण्यात येणार आहेत. ल्युपेक्स मिशनमध्ये लॅण्डर-रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवले जाईल. हे मिशन २०२६-२८ दरम्यान पूर्ण केले जाऊ शकते.
भारत आणि जपानचे शास्त्रज्ञ चांद्रयान-४ मोहिमेत अनेक बदल करणार आहेत. जपानचे शिष्टमंडळ यावर्षी एप्रिलमध्ये भारतात आले होते. चंद्रावरील लॅण्डिंग साईटबाबत शिष्टमंडळाने इस्रोशी चर्चा केली होती. लॅण्डिंगची इतर ठिकाणेही शोधण्यात आली. ही मोहीम यशस्वी झाल्यास, भारत आणि जपान एकत्रितपणे चंद्राच्या पृष्ठभागावर १.५ मीटर खोल खड्डा खणतील आणि तेथून मातीचे नमुने आणतील. यात ग्राऊंड पेनिट्रेटिंग रडार देखील वापरता येईल. खड्डा खोदण्यापूर्वी रोव्हर मातीच्या आत असलेल्या पाण्याचा शोध घेईल. यासाठी तो लेझर तंत्रज्ञानाची मदत घेणार आहे.