किमान तापमान : 23.32° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादल– राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केला उल्लेख,
नवी दिल्ली, (३१ जानेवारी) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज बुधवारी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना भारतीय रेल्वेने गेल्या १० वर्षांत सुरू केलेल्या अनेक उपक्रमांचा उल्लेख केला. नमो भारत, अमृत भारत आणि वंदे भारत यांसारख्या नवीन ट्रेन्सचा संदर्भ देत मुर्मू म्हणाले की, देशात २५ हजार किलोमीटरहून अधिक रेल्वे ट्रॅक टाकण्यात आले आहेत, जे अनेक विकसित देशांतील रेल्वे ट्रॅकच्या एकूण लांबीपेक्षा जास्त आहे.
राष्ट्रपती म्हणाले की, भारत रेल्वेच्या १०० टक्के विद्युतीकरणाच्या अगदी जवळ आहे. देशात प्रथमच सेमी-हाय स्पीड ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत. आज वंदे भारत गाड्या ३९ हून अधिक मार्गांवर धावत आहेत. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत १३०० हून अधिक रेल्वे स्थानकांचे पुनरुज्जीवन केले जात आहे. भारतीय रेल्वेमध्ये प्रवास करण्यासाठी रेल्वे प्रत्येक तिकिटावर सुमारे ५० टक्के सूट देते. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय प्रवाशांचे दरवर्षी ६० हजार कोटी रुपयांची बचत होत आहे. मेट्रो सुविधा केवळ ५ शहरांपुरती मर्यादित होती, ती आज २० शहरांमध्ये उपलब्ध आहे.