किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.6° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.6° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (०३ फेब्रुवारी) – पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामागे वैयक्तिक कारणं असल्याचा दाखला देत, त्यांनी आपला निर्णय जाहीर केला. त्यांनी वर्ष २०२१ मध्ये पंजाबचे ३६ वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली होती. त्यांनी आज शनिवारी आपले राजीनामापत्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर केले आहे. आपल्या पत्रात, मी वैयक्तिक कारणांनी आणि अन्य काही जबाबदाऱ्यांमुळे पंजाबच्या राज्यपालपदाचा आणि चंडीगड या केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासकपदाचा राजीनामा देत आहे, असे नमूद केले आहे.
ऑगस्ट २०२१ मध्ये त्यांनी पंजाबचे ३६ वे राज्यपाल म्हणून त्यांनी शपथ घेतली होती. पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवीशंकर झा यांनी त्यांना शपथ देवविली होती. बनवारीलाल पुरोहित तीन वेळा लोकसभेचे खासदार राहीलेले असून, मध्य भारतातील सर्वात जुन्या इंग्रजी दैनिकाचे प्रबंध संचालक म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांची ओळख प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ता आणि राष्ट्रवादी विचारवंत म्हणून आहे. सामाजिक कार्य आणि सार्वजनिक जीवनाचा त्यांचा अनुभव ४० वर्षांपेक्षा जास्त आहे. १६ एप्रिल १९४० रोजी जन्मलेले बनवारीलाल पुरोहीत यांनी शालेय शिक्षण नागपूर आणि राजस्थानमधून केले.
ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे वाणिज्य पदवीप्राप्त असून, सक्रीय राजकारणात आवड असल्यामुळे त्यांनी राजकारणाचा मार्ग स्वीकारला. महाराष्ट्रातील मागास भाग म्हणजेच विदर्भाची सातत्याने उपेक्षा होत असल्याचा मुद्दा त्यांनी उचलून धरला. वर्ष १९७८ मध्ये त्यांनी नागपूर पूर्व आणि वर्ष १९८० मध्ये नागपूर दक्षिण मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकून आले. त्यांच्याकडे महाराष्ट्राचे शहरी विकास, झोपडपट्टी सुधारणा आणि निवास मंत्रालय होते. वर्ष १९८४, १९८९ आणि १९९६ मध्ये ते नागपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून कार्यरत होते. त्यांना सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणारे सक्रीय खासदार म्हणून कार्यरत होते. त्यांना सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणारे सक्रीय खासदार म्हणून निवडण्यात आले होते. दरम्यान, राज्यपालपदाची सूत्रे आता कोणाकडे सोपविली जातील? या चर्चेला ऊत आला आहे.