किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– २०२४ ते २०३१ दरम्यान भारतीय अर्थव्यवस्थेबाबत क्रिसिलचा अंदाज,
कोलकाता, (०३ फेब्रुवारी) – २०२४ ते २०३१ या काळात या दशकाच्या अखेरपर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग सरासरी ६.७ टक्के राहील, असा अंदाज क्रिसिलने ताज्या अहवालात वर्तवला आहे.
या वृद्धीत सर्वाधिक योगदान भांडवलाचे असेल. खाजगी क्षेत्राद्वारे पुरेशी गुंतवणूक होत नसताना सरकारच्या गुंतवणुकीवर आधारित धोरणांचा हा परिणाम आहे. बांधकाम क्षेत्रातील खर्चाला पाठिंबा देण्यासाठी आणि राज्यांना त्यांच्या स्वतःच्या गुंतवणुकीच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी व्याजमुक्त कर्ज देण्यासाठी सरकारने खर्चात लक्षणीय वाढ केली, असे अहवालात म्हटले आहे.
या आर्थिक वर्षात ७.३ टक्क्यांच्या मजबूत वाढीनंतर पुढील वर्षात ६.४ टक्क्यांपर्यंत वाढ होईल, असे क्रिसिलने म्हटले आहे. ऊर्जा आणि लॉजिस्टिक खर्चावर मध्य पूर्व संघर्षाच्या वाढीव परिणामांवर लक्ष ठेवण्याचीही गरज आहे, असे यात म्हटले आहे.