|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.62° C

कमाल तापमान : 31.87° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 68 %

वायू वेग : 8.17 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.87° C

Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.72°C - 32.01°C

broken clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.59°C - 30.85°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.63°C - 30.61°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.59°C - 30.22°C

scattered clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.52°C - 30.88°C

light rain
Weather Forecast for
Sunday, 26 May

28.92°C - 30.67°C

light rain
Home »

सरकारी बाबूंना मिळणार वेतनाच्या २०० पट गृहकर्ज

सरकारी बाबूंना मिळणार वेतनाच्या २०० पट गृहकर्जमुंबई, [२१ जानेवारी] – गगनाला भिडलेल्या घरांच्या किमती आणि सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले गृहकर्ज यामुळे सरकारी अधिकारी व कर्मचार्‍यांना हक्काचे घर घेणे हे जवळजवळ अशक्य झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारी कर्मचार्‍यांची ‘घरघर’ संपवण्यासाठी मूळ वेतनाच्या २०० पट गृहकर्ज देण्यासंदर्भातला महत्त्वपूर्ण निर्णय अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. सध्याच्या प्रचलित नियमानुसार घरबांधणी अग्रीम वेतन बँडमधील वेतन अधिक ग्रेड वेतनाच्या ५० पट किंवा १५ लाख किंवा परतफेडीची क्षमता यापैकी कमी असेल ती रक्कम...21 Jan 2015 / No Comment /

यंदाच्या गाळप हंगामासाठी ऊस खरेदीकर माफ

यंदाच्या गाळप हंगामासाठी ऊस खरेदीकर माफ=राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय= मुंबई, [२० जानेवारी] – राज्यातील २०१४-१५ च्या गाळप हंगामातील उसाचा खरेदीकर माफ करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाने शेतकर्‍यांना एफआरपीनुसार (रास्त किफायतशीर दर) ऊस दर देण्यास साखर कारखान्यांना मदत होणार आहे. तसेच खुल्या बाजारात साखरेचे कोसळलेले दर पहाता एफआरपी देण्यासाठी आवश्यक ती रक्कम उपलब्ध झाली पाहिजे, अशी मागणी सहकारी साखर कारखान्यांकडूनही करण्यात येत होती. राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांना दिलेल्या उसाच्या किंमतीवर ऊस खरेदीकर...21 Jan 2015 / No Comment /

विधानपरिषद निवडणुकीतून कॉंग्रेसची माघार?

विधानपरिषद निवडणुकीतून कॉंग्रेसची माघार?=स्वतंत्र अधिसूचना न निघाल्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादी अडचणीत= मुंबई, [१६ जानेवारी] – ३० जानेवारी रोजी विधान परिषदेच्या चार जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीची स्वतंत्र अधिसूचना न निघाल्यामुळे कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची कोंडी झाली आहे. त्यामुळे निवडून येण्यासाठी पुरेसे संख्याबळ आणि तांत्रिक बाबी तपासल्यानंतरच निवडणुकीचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली. सत्ताधारी पक्षाचे संख्याबळ पाहता कॉंग्रेस पक्षाचा एकही उमेदवार निवडून येणार नसल्याने कॉंग्रेस या निवडणुकीतून माघार घेणार असल्याची...17 Jan 2015 / No Comment /

पाच वर्षात उद्योग उभारणे बंधनकारक

पाच वर्षात उद्योग उभारणे बंधनकारक=अकृषक परवानगी मिळाल्यानंतर नियोजन करा : मुख्यमंत्र्यांचे आदेश= मुंबई, [१५ जानेवारी] – औद्योगिक वापराकरिता अकृषक परवानगी घेतल्यानंतर त्या जमिनीवर पाच वर्षांच्या आत उद्योग उभारणे बंधनकारक राहील आणि जमिनीचा गैरवापर होणार नाही याचे नियोजन करावे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गुरुवारी येथे दिले. ‘मेक इन महाराष्ट्र’ अंतर्गत ‘इज ऑफ डुईंग बिझिनेस’साठी करायच्या उपाययोजनांचा आढावा सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीला उद्योग मंत्री सुभाष...16 Jan 2015 / No Comment /

खचून न जाता जनतेत सक्रिय रहा

खचून न जाता जनतेत सक्रिय रहा=पराभूत उमेदवारांना मुख्यमंत्र्यांचा सल्ला= मुंबई, [१४ जानेवारी] – विधानसभेच्या बहुरंगी लढतीत भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडणूक लढविणारे, मात्र पराभूत झालेल्या पक्षाच्या उमेदवारांचे सांत्वन करून, पराभवाने खचून न जाता पक्षाच्या माध्यमातून जनतेत सक्रिय रहावे, असा मोलाचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या पराभूत उमेदवारांना दिला. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवलेल्या मात्र, पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक मुंबईत विधानभवनात आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश,...15 Jan 2015 / No Comment /

विवेकानंद युवा मित्र नेमणार

विवेकानंद युवा मित्र नेमणार=शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची घोषणा= मुंबई, [१२ जानेवारी] – सामाजिक बांधिलकी जपून, व्यसनमुक्ती सारख्या अभियानासह विविध समाज जागृतीच्या कार्यात युवकांचे सहकार्य व योगदान लाभावे यासाठी विवेकानंद युवा मित्र योजना राबविली जाणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी येथे दिली. तालुका स्तरावर तीन हजार तर जिल्हा स्तरावर पाच हजार रुपये मानधन या युवा मित्रांना मिळेल तर, ही नेमणूक एका वर्षासाठी असेल, असेही त्यांनी सांगितले. प्रत्येक तालुक्यात तसेच सर्व...13 Jan 2015 / No Comment /

मंत्रालयात जाण्यासाठी करा ऑनलाईन नोंदणी

मंत्रालयात जाण्यासाठी करा ऑनलाईन नोंदणी=आता रांग लावण्याची गरज राहणार नाही= मुंबई, [११ जानेवारी] – आपल्या तक्रारी घेऊन किंवा अन्य कामानिमित्त मंत्रालयाची पायरी चढणार्‍या महाराष्ट्रभरातील नागरिकांना आता मोठमोठ्या रांगांमध्ये उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही. येत्या १५ तारखेपासून त्यांना केवळ ऑनलाईन नोंदणी करून थेट मंत्रालयात प्रवेश करता येणार आहे. महाराष्ट्र सरकारने ही अभिनव योजना अंमलात आणण्याचे जाहीर केले आहे. माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव राजेश अग्रवाल यांनी ही माहिती दिली. हस्तलिखित प्रवेश पावती भरण्यासाठी मंत्रालयाबाहेर लांब...11 Jan 2015 / No Comment /

दुष्काळ निवारणासाठी ४८०० कोटींची मदत

दुष्काळ निवारणासाठी ४८०० कोटींची मदत= ४८०० कोटींची केंद्राची मदत ७ दिवसात : फडणवीस= नवी दिल्ली, [१० जानेवारी] – राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या निवारणासाठी केंद्राकडे ४८०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती, ही राशी पुढच्या आठवड्यात देण्याचे आश्‍वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. भाजपाच्या मेळाव्यासाठी दिल्लीत आले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि राष्ट्रीय आपत्तीनिवारण समितीचे प्रमुख राजनाथसिंह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर महाराष्ट्र सदनात पत्रकारांशी...11 Jan 2015 / No Comment /

मुख्यमंत्र्यांनी शब्द खरा केला

मुख्यमंत्र्यांनी शब्द खरा केलाभ्रष्ट बाबूंना दिला दणका विदर्भातील तिघांसह आठ अधिकार्‍यांची संपत्ती गोठविणार मुंबई, [९ जानेवारी] – राज्य प्रशासनातील भ्रष्ट अधिकार्‍यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ठोस पुराव्यांसह पाठविलेली कोणतीही फाईल दडविली जाणार नाही आणि अशा अधिकार्‍यांना पाठीशी घातले जाणार नाही, हा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरा करून दाखविला आहे. राज्यातील अशा आठ भ्रष्ट अधिकार्‍यांविरुद्ध कारवाई करताना मुख्यमंत्र्यांनी त्यांची संपत्ती गोठविण्याचा आदेश दिला आहे. यात विदर्भातील तिघांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी भ्रष्ट...10 Jan 2015 / No Comment /

विधान परिषदेच्या ४ जागांसाठी ३० जानेवारीला निवडणूक

विधान परिषदेच्या ४ जागांसाठी ३० जानेवारीला निवडणूक=सर्व जागा महायुतीलाच मिळणार= मुंबई, [८ जानेवारी] – पृथ्वीराज चव्हाण, विनोद तावडे आणि आशीष शेलार हे विधानसभेवर निवडून गेल्याने आणि विनायक मेटे यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या चार जागांसाठी येत्या ३० जानेवारी रोजी पोटनिवडणूक घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. आयोगाने गुरुवारी निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली. सत्ताधारी भाजपा-शिवसेनेकडे दोन्ही पक्षांचे मिळून १८५ आणि किमान दहा अपक्ष असे मोठे संख्याबळ असल्याने चारही जागांवर युतीचेच उमेदवार सहज निवडून येऊ...9 Jan 2015 / No Comment /

धनगर आरक्षणास विरोध नाही

धनगर आरक्षणास विरोध नाही=आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांची स्पष्टोक्ती= नाशिक, [८ जानेवारी] – धनगर समाजास आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. परंतु, आदिवासींसाठी असलेल्या सात टक्के आरक्षाणास धक्का न लावता त्यांना आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. आदिवासींच्या आरक्षणात घुसखोरी आम्ही कदापी सहन करणार नसल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी केले. भाजपा आदिवासी प्रदेश आघाडीतर्फे रॉयल हेरिटेज हॉटेलमध्ये आयोजित सदस्य नोंदणी कार्यशाळेप्रसंगी ते बोलत होते. पदाधिकार्‍यांची राज्यभर सदस्य नोंदणी मोहीम सुरू आहे....9 Jan 2015 / No Comment /

भाजपाचे काम तळागाळापर्यंत पोहोचविणार

भाजपाचे काम तळागाळापर्यंत पोहोचविणार=नवे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा निर्धार= मुंबई, [८ जानेवारी] – भारतीय जनता पार्टीचे काम राज्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचविण्याचा आपला निर्धार असून, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राज्यात एक कोटी प्राथमिक सदस्य नोंदविण्याचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करू, असा विश्‍वास भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी व्यक्त केला. महाराष्ट्र भाजपाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यानंतर रावसाहेब दानवे यांचे गुरुवारी प्रथमच मुंबईत आगमन झाले. प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत...9 Jan 2015 / No Comment /